Railway Jobs : ना परीक्षा, ना मुलाखतीचं टेन्शन; १० वी पास उमेदवारांना रेल्वेत मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 03:08 PM2021-03-10T15:08:38+5:302021-03-10T15:19:13+5:30

Railway Recruitment 2021: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नक्कीच ही चांगली माहिती आहे. भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी आहे. जाणून घेऊयात रेल्वेतील नोकरीबाबत सर्व माहिती...

भारतीय रेल्वेत अनेक पदांवर मोठी नोकरभरती निघाली आहे. एकूण १३० पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे इयत्ता दहावीपर्यंतचं शिक्षण केलेल्यांनाही अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवार १५ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.

दहावीमध्ये फक्त उमेदवाराचे किमान ५० टक्के गुण असले पाहिजेत. यासोबतच उमेदवाराचा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेलं गरजेचं आहे.

अॅप्रेंटिससाठी उमेदवाराचं वय १५ ते २४ दरम्यान असणं आवश्यक आहे. यामध्ये आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेच्या अटीत सूट देण्यात आली आहे.

रेल्वेतील अॅप्रेंटिस नोकरीसाठी त्याच्या वैयक्तीक माहितेचे कागदपत्र असणं गरजेचं आहे.

पासपोर्ट साइज फोटो, उमेदवाराची स्वाक्षरी, इयत्ता १० वीचं उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र गरजेचं आहे.

उमेदवारांची निवड ही त्यांच्या मेरीटवरुन केली जाणार आहे. अर्जाचे शुल्क १०० रुपये इतके असून यात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती यासोबतच दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेलं नाही.

Read in English