सरकारी नोकरी: AIIMS मध्ये १५० हून अधिक जागांसाठी भरती, किती मिळणार पगार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 09:10 AM2022-05-07T09:10:15+5:302022-05-07T09:17:47+5:30

Medical Job Vacancy: मेडिकल जॉबच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. AIIMS मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) भोपाळने सिनिअर रेजिडेंट्स (नॉन-अकॅडमिक) भरती २०२२ साठीचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. जर तुम्ही भरतीसाठी पात्र असाल आणि अर्ज करू इच्छुक असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.

इच्छुक उमेदवारांनी aiimsbhopal.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ मे २०२२ पर्यंत आहे. एम्स भोपाळकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार भरती अभियानाच्या माध्यामातून सिनिअर रेजिडेंट पदावर एकूण १५९ पदांची भरती केली जाणार आहे.

१५९ पदांमध्ये १३ जागा एसटी प्रवर्गासाठी, २३ जागा एससी, ओबीसीसाठी ४४, ईडब्ल्यूएशसाठी १५ आणि जनरल कॅटेगरीसाठी ६४ जागा आरक्षित आहेत.

उमेदवार NMC/DCI मधून मान्यताप्राप्त संस्थेतून एमडी, एमएस, डीएनबी किंवा एमडीएसमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल डीग्री असणं गरजेचं आहे. याशिवाय एनएमसी किंवा डीसीआय, स्टेट मेडिकल अथवा डेंटल काऊन्सिलमधून वॅलिड रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे.

एसआर पोस्टसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय ४५ वर्षांच्या आत असणं गरजेचं आहे. पण आरक्षित प्रवर्गासाठी उमेदवारांना सरकारी मापदंडानुसार वयोमर्यादेच्या कमाल मर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

सीनिअर रेजिडेंट (SR) पदाच्या नोकरीसाठी उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा ६७,७०० रुपये (पे लेव्हल-११) इतका पगार मिळेल. याशिवाय एनपीएसह अनेक भत्त्यांचाही लाभ मिळणार आहे.

योग्य उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा दोन्ही पद्धतीनं होण्याची शक्यता आहे. याचा निर्णय सर्वस्वीपणे इन्स्टिट्यूट घेईल. उमेदवारांना आवश्यक माहिती मिळवण्यासाठी वेबसाइटवर भेट देत राहणं गरजेचं आहे.

जनरल आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना १५०० रुपये अर्ज शुल्क जमा करावं लागणार आहे. तर ईडब्ल्यूएस, एससी किंवा एसटी कॅटेगरीसाठी उमेदवारांना १२०० रुपये अर्ज शुल्क जमा करावं लागणार आहे.