ATM मधून फाटक्या नोटा आल्या तर काय करायचं? जाणून घ्या, काय सांगतो RBI चा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 04:11 PM2021-09-19T16:11:35+5:302021-09-19T16:18:06+5:30

आरबीआयच्या नियमानुसार, एटीएममधून खराब अथवा फाटक्या नोटा आल्या, तर त्या बदलून देण्यास बँक नकार देऊ शकत नाही. महत्वाचे म्हणजे या नोटा बदलून घेण्यासाठी कुठलीही मोठी प्रक्रिया नाही.

अनेकवेळा एटीएममधून खराब अथवा फाटलेल्या नोटा येतात आणि लोक अस्वस्थ होतात. या नोटांचे काय कारावे? असा प्रश्नही त्यांना पडतो. दुकानदारही अशा नोटा घेण्यास अनेक वेळा नकार देतात. मात्र, असा प्रकार तुमच्या सोबत घडला तर मुळीच घाबरू नका. अशा खराब नोटा तुम्ही सहजपणे बदलून घेऊ शकता. (you can exchange mutilated and tampered damaged currency notes know about the rule of RBI currency change) - (File Photo)

काय आहे RBI चा नियम - आरबीआयच्या नियमानुसार, एटीएममधून खराब अथवा फाटक्या नोटा आल्या, तर त्या बदलून देण्यास बँक नकार देऊ शकत नाही. महत्वाचे म्हणजे या नोटा बदलून घेण्यासाठी कुठलीही मोठी प्रक्रिया नाही. तुम्ही केवळ काही मिनिटांच्या आतच नोटा बदलून घेऊ शकतात. (File Photo)

अशी आहे प्रक्रिया - एटीएममधून आलेल्या फाटक्या नोटा, संबंधित एटीएम ज्या बँकेशी कनेक्ट असेल, त्या बँकेत घेऊन जा. तेथे गेल्यानंतर, आपल्याला एक अॅप्लिकेशन द्यावे लागेल. यात आपल्याला पैसे काढल्याची तारिख, वेळ, तसेच ते जेथून काढले त्या ठिकाणाचे नावही लिहावे लागेल. या अॅप्लिकेशनसोबत एटीएममधून निघालेल्या स्लिपची कॉपीही जोडावी लागेल. जर स्लिप आली नसेल, तर मोबाईलवर आलेल्या ट्रांझेक्शन डिटेलची माहिती द्यावी लागेल. (File Photo)

बँक नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही - बँकेला संपूर्ण तपशील देताच, आपल्याला तत्काळ नोटा बदलून मिळतील. एप्रिल 2017 मध्ये, आरबीआयने आपल्या एका मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे, की बँका खराब झालेल्या अथवा फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाहीत. सर्व बँका आपल्या प्रत्येक शाखेत लोकांच्या फाटलेल्या अथवा खराब झालेल्या नोटा बदलून देतील. (File Photo)

SBI चा नियम - देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) नुकतेच खराब झालेल्या अथवा फाटलेल्या नोटांसंदर्भात ग्राहकाने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे, की बँकेत नोटांच्या गुणवत्तेची तपासणी अत्याधुनिक नोट सॉर्टिंग मशीनद्वारे केली जाते. यामुळे फाटलेल्या अथवा खराब झालेल्या नोटा मिळण्याची शक्यता क्वचितच असते. असे असले तरी, ग्राहकाला एटीएममधून अशा नोटा मिळाल्याच, तर तो बँकेच्या कोणत्याही शाखेतून बदलून घेऊ शकतो. (File Photo)

नोटा बदलून दिल्या नाही तर, बँकेला दंड होणार - RBI ने जुलै 2016 मध्ये एक परिपत्रक काढून म्हटले आहे, की बँकांनी खराब नोटा बदलण्यास नकार दिला तर, त्यांना 10,000 रुपये दंड आकारला जाईल आणि हे सर्व बँकांच्या सर्व शाखांसाठी लागू असेल. (File Photo)

फटक्या नोटा निघाल्याच तर ती बँकेची जबाबदारी - RBI ने म्हटले आहे, की ATM मधून खराब अथवा खोट्या नोटा आल्या तर त्याची संपूर्ण जबाबदारी केवळ बँकेचीच असते. महत्वाचे म्हणजे, ज्या एजन्सीने त्या नोटा ATM मध्ये टाकल्या, त्या एजन्सीचीही ही जबाबदारी नाही. नोटेत काही खराबी असेल, तर ती बँकेच्या कर्मचाऱ्याकडून व्यवस्थितपणे तपासली जायला हवी. जर, नोटेवर सिरयल नंबर, गांधीजींचा वॉटरमार्क आणि गवर्नरांची शपथ दिसत असले, तर ती त्याला बदलून द्यावीच लागेल. (File Photo)

फाठलेल्या नोटांसंदर्भात RBI चा नियम - आरबीआय फाटलेल्या नोटांसंदर्भात वेळोवेळी परिपत्रक जारी करत असते. अशा नोटा तुम्ही कोणत्याही बँक शाखेतून किंवा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयातून सहज बदलू शकता. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, एका व्यक्तीला एका वेळी जास्तीत जास्त 20 नोटाच बदलता येऊ शकतात. या नोटा 5000 रुपयांपेक्षा अधिक नसाव्यात. (File Photo)

अशा नोटा बदलता येणार नाही - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, अधिक जळालेल्या, तुकडे-तुकडे होण्याच्या अवस्थेत असलेल्या नोटा बदलल्या जाऊ शकत नाहीत. अशा नोटा फक्त RBI च्या इश्यू ऑफिसमध्येच जमा केल्या जाऊ शकतात. (File Photo)