Vodafone-Idea नं आणले १५० रुपयांपेक्षा स्वस्त महिनाभर चालणारे प्लॅन्स; Airtel, Jio ला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 09:18 PM2022-04-05T21:18:41+5:302022-04-05T21:27:15+5:30

Vodafone Idea ने गेल्या काही दिवसात अनेक नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत.

Vodafone Idea ने गेल्या काही दिवसात अनेक नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. या नवीन प्लॅनच्या यादीमध्ये 337 रुपये, 107 रुपये आणि 111 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.

परंतु आता कंपनीनं महिनाभर चालणारे आणखी दोन स्वस्त प्लॅन्स लॉन्च केले आहेत. यामध्ये 137 रुपयांच्या आणि 141 रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. जर तुम्ही Vodafone Idea च्या वेबसाइटवर लिस्ट केलेल्या प्रीपेड प्लॅनच्या 'Others' सेक्शनमध्ये गेलात तर तुम्हाला कंपनीने लॉन्च केलेले हे दोन नवीन प्लॅन सापडतील.

Vodafone Idea चा 137 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. परंतु या प्लॅनसह ग्राहकांना व्हॉइस कॉलिंगसाठी केवळ दहा ऑन-नेट नाईट मिनिटे मिळणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय.

याव्यतिरिक्त, सर्व कॉलसाठी ग्राहकांकडून 2.5 पैसे/सेकंद शुल्क आकारले जाईल. रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत नाईट कॉल मिनिटे उपलब्ध असतील. याशिवाय आऊटगोईंग एसएमएससाठी 1/1.5/5 रुपये शुल्क आकारले जाईल.

तर दुसरीकडे कंपनीचा 141 रुपयांचा प्लॅन 31 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनसह, ग्राहकांना व्हॉईस कॉलिंगसाठी 10 ऑन-नेट नाईट मिनिटे मिळतील. याचा वापर रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत या वेळेत करता येऊ शकतो.

तसंच यामध्ये एसएमएससाठी 137 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच शुल्क लागू आकारलं जाणार आहे. दोन्ही प्लॅनमधील फरक एवढाच आहे की 141 रुपयांचा प्लॅन एका दिवसाच्या अतिरिक्त वैधतेसह येतो.

Vi ने 30 आणि 31 दिवसांच्या प्रीपेड प्लॅन्सची सीरिज लॉन्च केली आहे आणि महिन्याच्या वैधतेसह सर्वाधिक प्लॅन्स हे व्होडाफोन आयडियानं लॉन्च केले आहेत.

Jio आणि Airtel ने देखील नवीन प्लॅन्स आणले आहेत. परंतु यापैकी कोणत्याही कंपनीनं कमी किमतीचं रिचार्ज करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केलेलं नाही. Vi सध्या नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याचा आणि जुन्या ग्राहकांना या प्लॅन्ससह कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.