Vodafone-Idea च्या 'या' प्लॅन्ससोबत मिळणार Disney+ Hotstar VIP चं सबस्क्रिप्शन; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 02:52 PM2021-03-11T14:52:27+5:302021-03-11T14:57:16+5:30

Vodafone Idea : पाहा कोणत्या प्लॅन्ससोबत मिळणार ग्राहकांना लाभ

व्होडाफोन-आयडियानं बुधवारी काही नव्या प्लॅन्सची घोषणा केली. या अंतर्गत ग्राहकांना मोठे लाभ देण्यात येणार आहेत.

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दूरसंचार कंपन्यांच्या शर्यतीत अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना टिकवण्यासाठी काही ना काही नवं देण्याचा प्रयत्न करत आहेत.

४०१ रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एका वर्षासाठी Disney+ Hotstar VIP सबस्क्रिप्शन दिलं जाणार असल्याचं कंपनीनं सांगितलं.

ही सुविधा ग्राहकांना ४०१ रूपये, ६०१ रूपये, ८०१ रूपये आणि ५०१ रूपयांचं रिचार्ज करणाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे.

तर ४९९ किंवा त्यापेक्षा अधिक रूपयांचं रिचार्ज करणाऱ्या पोस्टपेड ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांसाठी भारतातील सर्वात मोठ्या व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्स पैकी एक Disney+ Hotstar यांच्या हाय क्वालिटी एन्टरटेन्मेंटसाठी आणि एका वर्षाच्या क्रिकेट सामन्यांसाठी करार केला असल्याची माहिती कंपनीनं दिली

भारतातील ग्राहकांना बेस्ट कंटेन्ट उपलब्ध करुन देणं जे मनोरंजनापासून क्रिकेटसारख्या लोकप्रिय कॅटेगरीपर्यंत असेल, असंही कंपनीनं नमूद केलं.

व्होडाफोन आयडिया या कंपनीनं यापूर्वीपासूनच काही ठराविक ग्राहकांसाठी अॅमोझॉन प्राईम, नेटफ्लिक्ससारखं सबस्क्रिप्शन दिलं आहे.

या वर्षी क्रिकेटच्या अॅक्शनसह हाय क्वालिटी, उत्तम कंटेन्ट जे Disney+ Hotstar ऑफर करते ते पूर्ण वर्षासाठी व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना ऑफर करून आम्हाला आनंद झाल्याची प्रतिक्रिया Disney+ Hotstar चे ईव्हीपी प्राभ सिमरन सिंग यांनी दिली.

४०१ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येते. तसंच यात अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि दररोज ३ जीबी डेटा देण्यात येतो.

तसंच ५०१ रूपयांच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांची व्हॅलिडिटी आणि ७५ जीबी डेटा देण्यात येणार आहे.

तर ६०१ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राकांना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, दररोज ३ जीबी डेटा आणि ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे.

याशिवाय कंपनी ३२ जीबी अतिरिक्त डेटाही देत आहे. त्यामुळे एकूण २०० जीबी डेटा देण्यात येतो.

जे ग्राहक ८०१ रूपयांचं रिचार्ज करतील त्यांना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, रोज ३ जीबी डेटा आणि ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.

तसंच यामध्ये ४८ जीबी अतिरिक्त डेटा देण्यात येईल. त्यानुसार एकूण ३०० जीबी डेटा देण्यात येणार आहे.

Read in English