आता नवीन PVC आधार कार्ड, घरबसल्या मागवू शकता!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 01:35 PM2020-10-13T13:35:33+5:302020-10-13T13:51:22+5:30

सध्या प्रत्येक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त नवीन सिमकार्ड मिळवताना आणि बँकेत खाते उघडताना सर्वात आधी आधार क्रमांक देणे आवश्यक आहे. तसेच, अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून आधार कार्ड वापरले जाते. मुलांच्या एडमिशनसाठी सुद्धा आधार कार्ड आवश्यक असते.

दरम्यान, युनिक आयडेंटिफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आता आधार कार्डचे पॉलिव्हिनाइल क्लोराईड (PVC) कार्ड जारी करत आहे. नवीन आधार कार्ड अगदी एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्डसारखे आहे. जे आपण पाकीटमध्ये सहजपणे ठेवू शकता.

तुमच्या मनात असा प्रश्न उद्भवू शकेल की पॉकेट साइजचे आधार कार्डदेखील यापूर्वी तयार केले गेले होते. मग यात नवीन काय आहे? नवीन पीव्हीसी कार्ड छापण्याची आणि लॅमिनेशनची गुणवत्ता अधिक चांगली असल्याचे यूआयडीएआयने स्वतः म्हटले आहे.

हे कार्ड बरीच वर्षे टिकेल. या व्यतिरिक्त नवीन पीव्हीसी आधार कार्डद्वारे, कार्डची सत्यता क्यूआर कोडद्वारे त्वरित पुष्टी केली जाईल. यात कोणतीही तांत्रिक समस्या उद्भवणार नाही.

यूआयडीएआयच्या या नवीन उपक्रमामुळे प्रत्येकाला यापुढे मोठ्या आकाराचे आधार कार्ड किंवा छपाईची प्रत ठेवण्याची गरज भासणार नाही. पाकीटातून केवळ पीव्हीसी आधार कार्ड काढा आणि ते सर्व कामासाठी वापरा.

याबाबत यूआयडीएआयने ट्विटद्वारे माहिती दिली आहे. 'तुमचे आधार आता अशा आकारात आले आहे, जे तुम्ही आपल्या पाकिटात ठेवू शकता', असे ट्विट यूआयडीएआयने केले आहे.

याशिवाय, यूआयडीएआयने ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'आता तुम्ही एक नवीन Aadhaar PVC Card मागवू शकता, जे दिसायला आकर्षक आहे आणि बरेच दिवस टिकेल. तसेच, हे आधुनिक सुरक्षित फिचर्ससह आहे. सुरक्षेसाठी या नवीन कार्डमध्ये एक होलोग्राम, Guilloche पॅटर्न, Ghost Image आणि मायक्रोटेक्स्ट फीचर्स देण्यात आले आहेत.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे पीव्हीसी आधार कार्ड पावसात देखील खराब होणार नाही. नवीन पीव्हीसी कार्डसाठी तुम्हाला यूआयडीएआयला ५० रुपये मोजावे लागतात. त्यानंतर हे कार्ड तुम्हाला घरपोच केले जाते.

तर, तुम्ही घरी बसून नवीन पीव्हीसी आधार कार्डची ऑर्डर करू शकता. यासाठी सर्वातआधी यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट (https://uidai.gov.in) वर जावे लागेल. त्यानंतर 'My Aadhaar Section' मध्ये 'Order Aadhaar PVC Card' वर क्लिक करा. ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करताच आपल्याला १२ अंकी आधार क्रमांक किंवा १६ अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा २८ अंकी ईआयडी क्रमांक द्यावा लागले. या तिन्हीपैकी एक क्रमांक द्यावा लागेल.

आधार क्रमांक दिल्यानंतर खाली दिलेला सिक्योरिटी कोड किंवा कॅप्चा कोड द्या. त्यानंतर खाली Send OTP क्लिक करा. त्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी सबमिट केल्यानंतर खाली दिलेल्या सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर पीव्हीसी कार्डची प्रीव्यू कॉपी स्क्रीनवर दिसून येईल. ज्यामध्ये आपल्या आधार संबंधित माहिती असेल.

शेवटी पेमेंटचा पर्याय येईल. त्यावर क्लिक करून, तुम्ही सर्व डिजिटल माध्यमाद्वारे ५० रुपये भरा. त्यानंतर आधार पीव्हीसी कार्डची ऑर्डर होईल. काही दिवसांनंतर पीव्हीसी आधार कार्ड स्पीड पोस्टद्वारे आपल्या घरी पोहोचेल.