Mutual Fund क्षेत्रात TATA ग्रुपच दादा! ‘या’ १० कंपन्यांना मोठी पसंती; तब्बल ११९० टक्के रिटर्न्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 11:01 AM2021-10-19T11:01:51+5:302021-10-19T11:08:31+5:30

TATA ग्रुपच्या १० कंपन्यांनी २०० टक्क्यांपासून ते तब्बल ११९० टक्क्यांपर्यंत Mutual Fund मार्केटमध्ये परतावा दिल्याचे सांगितले जात आहे.

रतन टाटा (Ratan Tata) यांचा TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. तसेच टाटा आता नवनव्या क्षेत्रातही पदार्पण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. TATA ग्रुपच्या १० कंपन्यांनी २०० टक्क्यांपासून ते तब्बल ११९० टक्क्यांपर्यंत रिटर्न दिलेले पाहायला मिळत आहे.

TATA ग्रुपमधील कंपन्या केवळ इक्विटी मार्केटमध्ये नाही, तर Mutual Fund मध्येही धमाका करत आहेत. अनेक म्युचुअल फंडातील गुंतवणूक ही TATA ग्रुपच्या अनेकविध कंपन्यात मोठ्या प्रमाणात केली आहे. गेल्या १० वर्षात TATA ग्रुपमधील या टॉप १० कंपन्यांनी ९५५ टक्क्यांपर्यंत रिटर्न्स देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

TATA ग्रुपमधील Tata Consultancy Services TCS ही Mutual Fund च्या क्षेत्रातील सर्वांधिक पसंतीची कंपनी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये टीसीएसने शेअर मार्केटमध्ये धूमाकूळ घातला असून, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. टीसीएसने गेल्या १० वर्षांत ५७७ टक्के रिटर्न्स दिले आहेत.

TATA ग्रुपमधील Tata Steel ही Mutual Fund च्या जगतातील गुंतवणूकदारांची दुसरी मोठी कंपनी आहे. म्युचुअल फंडासह शेअर मार्केटमध्येही या कंपनीचा चांगला दबदबा आहे. गेल्या १० वर्षांत टाटा स्टील कंपनीने म्युचुअल फंड मार्केटमध्ये २१४ टक्के रिटर्न्स दिले आहेत. तर गेल्या वर्षभरात तब्बल २५८ टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवला आहे.

TATA ग्रुपमधील Tata Voltas ही Mutual Fund च्या क्षेत्रातील गुंतवणूकदारांची आणखी एक चांगल्या पसंतीची कंपनी आहे. AC निर्मितीमध्ये देशभरात टाटा व्होल्टास कंपनी आघाडीवर असून, एसीईएमएफनुसार, म्युचुअल फंडातील मार्केटमध्ये या कंपनीने गेल्या १० वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल ११९० टक्क्यांपर्यंत रिटर्न्स दिले आहेत.

TATA ग्रुपमधील Titan ही कंपनी Mutual Fund मध्ये खूपच लोकप्रिय आहे. अलीकडेच टायटन कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वधारल्याचे पाहायला मिळाले. अगदी राकेश झुनझुनवाला यांनीही टायटनमध्ये मोठी गुंतवणूक केली. म्युचुअल फंड मार्केटमध्ये गेल्या १० वर्षांत टायटन कंपनीने १००० टक्के रिटर्न्स दिले आहेत.

TATA ग्रुपमधील Tata Consumer ही कंपनी Mutual Fund क्षेत्रात गुंतवणूकदारांची पसंतीची कंपनी आहे. चहा आणि कॉफी उत्पादनात ही कंपनी देशात आघाडीवर आहे. म्युचुअल फंड मार्केटमध्ये गेल्या १० वर्षात टाटा कन्झुमर कंपनीने तब्बल ८२५ टक्के रिटर्न्स दिले आहेत.

TATA ग्रुपमधील Tata Motors ही कंपनी Mutual Fund जगतात गुंतवणूकदारांची आणखी एक आवडती आहे. टाटा मोटर्सने शेअर मार्केटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तसेच वाहन विक्री क्षेत्रातही उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये सर्वांत आघाडीवर असून, म्युचुअल फंड मार्केटमध्ये या कंपनीने गेल्या १० वर्षांत १३५ टक्के रिटर्न्स देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

TATA ग्रुपमधील Tata Power ही कंपनी Mutual Fund क्षेत्रातील दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरली आहे. गेल्या १० वर्षांत म्युचुअल फंड मार्केटमध्ये टाटा पॉवर कंपनीने १४२ टक्के रिटर्न्स देऊन गुंतवणूकदारांना दुप्पट फायदा करून दिल्याचे सांगितले जात आहे.

TATA ग्रुपमधील The Indian Hotels ही कंपनी Mutual Fund क्षेत्रातील गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आणि पसंतीची कंपनी आहे. द इंडियन हॉटेल्स कंपनी हॉटेल्स, रिसॉर्ट, जंगल सफारी, पॅलेस, स्पा आणि इन-फ्लाइट कॅटरिंग सर्व्हिसेसमध्ये अग्रगण्य असून, म्युचुअल फंड मार्केटमध्ये गेल्या १० वर्षांत २२७ टक्के परतावा दिला आहे.

TATA ग्रुपमधील Trends Limited ही कंपनी Mutual Fund मधील आणखी एक गुंतवणूकदारांच्या पसंतीची कंपनी असून, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ट्रेन्ड लिमिडेट उत्तम असल्याचे सांगितले जाते. म्युचुअल फंड मार्केटमध्ये गेल्या १० वर्षांत या कंपनीने ९५५ टक्के परतावा दिला आहे.

TATA ग्रुपमधील Tata Chemicals ही कंपनी Mutual Fund क्षेत्रातील गुंतवणूकदारांची पसंतीची कंपनी आहे. टाटा केमिकल्स केवळ भारतात नाही, तर युरोप, अमेरिका आणि अफ्रिका देशांमध्येही कार्यरत आहे. रसायन, पीक संरक्षण आणि रसायन उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असून, म्युचुअल फंड मार्केटमध्ये टाटा केमिकल्सने गेल्या १० वर्षांत या कंपनीने २२३ टक्के परतावा दिला आहे.