कधी ३ कोटी, तर कधी ४ कोटींच्या कारमधून प्रवास करतात अदानी, कलेक्शन पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 07:53 PM2023-02-04T19:53:38+5:302023-02-04T19:59:06+5:30

गौतम अदानी यांना आलिशान गाड्यांची आवड आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी चार कोटी रुपयांची कार खरेदी केली होती. त्यानंतर ते चर्चेतही आले होते.

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. यूएस स्टॉक एक्स्चेंज डाऊ जोन्सने अदानी एंटरप्रायझेसला त्यांच्या सस्टेनबिलिटी इंडेक्समधून वगळले आहे. 24 जानेवारीच्या संध्याकाळी हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरची किंमत 3400 रुपयांच्या जवळ होती. शुक्रवारी शेअर बाजार बंद होईपर्यंत तो 1,531 रुपयांपर्यंत घसरला. शेअरच्या किमती घसरल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

वैयक्तिक आयुष्यात पाहिलंत तर गौतम अदानी यांना लक्झरी कार्सची आवड आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी चार कोटी रुपयांची कार खरेदी केली होती. त्यामुळे ते चर्चेतही आले होते. आज आम्‍ही तुम्‍हाला अदानींच्‍या निवडक आलिशान कार्सबद्दल सांगत आहोत.

रेंज रोवर 3.0 डिझेल - गौतम अदानी यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये पांढऱ्या रंगाची रेंज रोव्हर खरेदी केली. त्याची किंमत सुमारे 4 कोटी असल्याचे सांगण्यात आले. हे मॉडेल रेंज रोव्हरचे ऑटोबायोग्राफी 30 डिझेल लाँग व्हीलबेस आहे. यात 7 जण बसू शकतात. 3.0 डिझेल कारमध्ये 3000 सीसी इनलाइन- 6 डिझेल इंजिन आहे, जे 346 बीएचपीची कमाल पॉवर आणि 700 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. लँड रोव्हरच्या या विशिष्ट मॉडेलमध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह फोर व्हील ड्राइव्ह (FWD) फीचर देखील आहे. याशिवाय एलईडी डीआरएल, एलईडी हेडलाइट्स, अलॉय व्हील यामध्ये उपलब्ध आहेत. यात 13.1-इंच टचस्क्रीन, हेड-अप डिस्प्ले, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस डिव्हाइस चार्जिंग आणि 3D सराउंड साउंड सिस्टम देखील मिळते.

रोल्स रॉईस घोस्ट सीरिज - गौतम अदानी यांच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस घोस्ट सीरिजचाही समावेश आहे. या कारचे इंटिरिअर आणि एक्सटिरिअर प्रीमियम आणि लक्झरी आहेत. यात 6.2-लिटर V12 इंजिन देण्यात आले आहे जे 5250 rpm वर 563 bhp आणि 1500 rpm वर 780 Nm टॉर्क जनरेट करते. Rolls-Royce Ghost Series ची भारतात किंमत 4.50 कोटी रुपयांपासून सुरू होते. भारतात विकल्या जाणाऱ्या सर्वात महागड्या कारपैकी ही एक आहे. ही कार 4.8 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढवू शकते. या कारचा कमाल वेग 250 किमी/तास आहे.

BMW 7 सीरिज - BMW इंडियाने अलीकडेच त्यांच्या लक्झरी फ्लॅगशिप सेडानची BMW 7 सीरिज लाँच केली आहे. भारतात त्याची सुरुवातीची किंमत 1.70 कोटी रुपये आहे. BMW 7 सिरीजमध्ये पॉवरट्रेनचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इंडिया-स्पेक 740i M Sport (740i M Sport) व्हेरिअंटमध्ये 3.0-लिटर, इनलाइन-6-सिलिंडर पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 375.4 bhp आणि 520 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 8-स्पीड एटी ट्रान्समिशनशी जोडलेले आहे आणि BMW ची xDrive AWD प्रणाली देखील मिळते.

टोयोटा वेलफायर - वेलफायर ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात महागडी टोयोटा कार आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 95 लाख रुपये आहे. ही कार सिंगल एक्झिक्युटिव्ह लाउंज प्रकारात येते. यात 2.5 लिटर पेट्रोल-हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे, जे 117 पीएस पॉवर आणि 198 एनएम टॉर्क जनरेट करते. हे फोर-व्हील ड्राइव्ह पॉवरट्रेनसह येते. यामध्ये फक्त CVT गिअरबॉक्स उपलब्ध आहे. Toyota Vellfire ही 7-सीटर MPV आहे. त्यात फुल-रेक्लाइन सीट्स आहेत. जे हिटेड, वेंटिलेटेड आणि मेमरी फंक्शनसह येते. यात ट्विन सनरूफ, सनशेड्स, अॅम्बियंट लाइटिंग आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स देखील मिळतात.

ऑडी Q7 - देशातील बहुतेक सुपरस्टार, उद्योगपतींकडे Audi Q7 दिसून येते. हे भारतात प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजी या दोन व्हेरिअंटमध्ये ती उपलब्ध आहे. त्याची सुरुवातीची किंमत सुमारे 80 लाख रुपये आहे. Audi Q7 मध्ये 3.0-लीटर V6 TFSI पेट्रोल इंजिन आहे. जे 48v माईल्ड-हायब्रिड प्रणालीसह जोडलेले आहे. हायब्रिड पॉवरट्रेन 340 एचपी पीक पॉवर आणि 500 एनएम टॉर्क जनरेट करते. यात क्रोम ट्रिम्ससह एक मोठे फ्रंट ग्रिल आहे. मॅट्रिक्स ऑल-एलईडी हेडलॅम्प आणि इंटिग्रेटेड एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, एक चंकी बंपर फ्रंट हे इतर डिझाइन एलिमेंट आहेत. यात मोठे स्पोर्टी अलॉय व्हील्स आहेत.

फरारी कॅलिफोर्निया - फेरारीची कॅलिफोर्निया लाइनअप अतिशय दमदार आहे. यात 3.8-लीटर ट्विन टर्बो V8 इंजिन देखील आहे. हे 553 hp @ 7,500 rpm आणि 557 lb-ft टॉर्क जनरेट करते. त्याचा टॉप स्पीड 315 किलोमीटर प्रति तास आहे. त्याची किंमत सुमारे 3.15 कोटी आहे. ही कार 9.52 किमी प्रति लीटर मायलेज देते. तुम्ही ते 12 रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये 4 एअरबॅगसह अनेक उच्चस्तरीय सिक्युरिटी फीचर्स देण्यात आली आहेत.