मुंबईत व्यावसायिकानं खरेदी केलं १००० कोटींचं घर; पाहा देशातील सर्वात महागडी ७ घरं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 02:27 PM2021-04-05T14:27:54+5:302021-04-05T14:33:49+5:30

काही दिवसांपूर्वीचे D Mart चे राधाकृष्णन दमानी यांनी खरेदी केलं होतं मोठं घर

महागडी घरं कायमच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत असतात. परंतु अनेकदा महागडी घरं कोणाची आहेत. ती कुठे आहेत असे प्रश्न आपल्याला पडतात.

काही दिवसांपूर्वीच डी मार्टचे संस्थापक राधाकृष्णन दमानी यांनी दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात १००१ कोटी रूपयांच्या घराची खरेदी केली. हे घर देशातील एक महागड घर म्हटलं जात आहे. त्यांनी आपले कनिष्ठ बंधू गोपीकिशन दमानी यांच्यासह मिळून हे घर विकत घेतलं आहे.

भारतातील नावाजलेले उद्योजक मुकेश अंबानी यांचं घर अँटिलिया हे सर्वात महागडं घर असल्याचं म्हटलं जातं. फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये हे घर तब्बस ७ हजार ३३७ कोटी रूपयांचं असल्याचं सागमअयात आलं होतं. फोर्ब्सनं हे घर जगातील सर्वात महागड्या घरांमध्ये सामील केलं होतं.

भारतातील नावाजलेले उद्योजक मुकेश अंबानी यांचं घर अँटिलिया हे सर्वात महागडं घर असल्याचं म्हटलं जातं. फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये हे घर तब्बस ७ हजार ३३७ कोटी रूपयांचं असल्याचं सागमअयात आलं होतं. फोर्ब्सनं हे घर जगातील सर्वात महागड्या घरांमध्ये सामील केलं होतं. बिझनेस इन्सायडरच्या एका रिपोर्टनुसार मुंबईतील पाली हिलभागात असलेलं अनिल अंबानी यांचं घर ६६ मीटर उंच आहे. याव्यतिरिक्त हे घर १६ हजार चौरस फुटांमद्ये बनलं आहे. अनिल अंबानी यांच्या घराची किंमत ५ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे.

पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार पूनावाला समुहाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी अमेरिक काऊन्सिलेटच्या लिंकन हाऊससाठी ७५० कोटी रूपयांची बोली लावली होती. ही बोली त्यांनी २०१५ मध्ये लावली होती. हा देशातील बंगल्याचा सर्वात मोठा व्यवहार होता.

२०१५ मध्ये उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांनी मलबार हिल परिसरात ३० हजार चौरस फुट क्षेत्रात पसरलेल्या जटिया हाऊसची ४२५ कोटी रूपयांना खरेदी केली होती. तसंच त्यांनी माहेश्वरी हाऊसचा विक्रमही तोडला होता जो २०१२ मध्ये ४०० कोटींना विकला गेला होता.

शाहरूख खानचा मन्नत हा बंगलादेखील भारतातील सर्वात महागड्या घरांमध्ये येतो. हा बंगला मुंबईतील वांद्रे परिसरात आहे. जेव्हा शाहरूखनं हा बंगला खरेदी केला होता तेव्हा तो व्हिला वियना म्हणून ओळखला जायचा. त्यानंतर त्यानं याचं नाव बदलून मन्नत असं केलं. फायनॅन्शिअल एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार या बंगल्याची किंमत जवळपास २०० कोटी रूपये आहे.

मद्यसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय माल्ल्याचं व्हाईट हाऊन इन द स्काय हे घर देशातील निवडक आलीशान घरांमध्ये गणलं जातं.

माल्ल्याच्या या घराची किंमत जवळपास १०० कोटी रूपये आहे. तसंच हे घर बंगळुरू येथे आहे. बिझनेस इन्सायडरच्या रिपोर्टनुसार यामध्ये त्या सर्व सुखसोयी आहेत ज्याची सामान्य माणूस कल्पनाही करू शकणार नाही.

टाटा समुहाचे मालक रतन टाटा यांचा बंगलाही देशातील महागड्या घरांमध्ये येतो. त्यांच्या बंगल्याची किंमत १२५ ते १५० कोटी रूपयांच्य जवळपास असून तो मुंबईतील कुलाबा परिसरात आहे. बिझनेस इन्सायडरच्या रिपोर्टनुसार हा बंगला १५ हजार चौरस फुटांमध्ये पसरला आहे. तसचं तो मोठ्या आणि खास घरांपैकी एक आहे.