SBI Gold Loan: एक मिस्ड कॉल देऊन सुरू होणार प्रोसेस, मिळणार ५० लाखांपर्यंत कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 10:48 AM2021-03-08T10:48:26+5:302021-03-08T10:54:05+5:30

जाणून घ्या कसं मिळेल कर्ज आणि किती असेल व्याजदर, State Bank Of India ९.६ टक्के दरानं पर्सनलही देत आहे.

अनेकदा आपल्याला पैशांची गरज असते आणि त्यावेळी अनेक जण वैयक्तिक कर्जाचा आधार घेत असतात. परंतु वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जांच्या तुलनेनं अधिक असतात.

अशा वेळी जर तुमच्याकडे सोन्याचे दागिनेअसतील तर तुमच्या गरजेनुसार ते बँकेकडे तारण ठेऊन तुम्ही कर्ज घेू शकता. याचे व्याजदर वैयक्तिक कर्जाच्या तुलनेनं कमी असतात.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ही वर्षाला ७.५ टक्के दरानं सोनं तारण ठेवून कर्ज देत आहे.

तर वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे त्यापेक्षा अधिक असून ते वार्षिक ९.६ टक्के इतके आहेत.

जर तुम्ही स्टेट बँकेकडून गृहकर्ज घेतलं असेल तर तुम्हाला सोनं तारण ठेवून ७.३ टक्के व्याजदरानं कर्ज घेता येईल.

सोनं तारण ठेवून स्टेट बँक आपल्या ग्राहकांना ५० लाख रूपयांपर्यंतचं कर्ज देत आहे. यासाठी कागदपत्रेदेखील तुलनेनं कमीच लागणार आहेत.

स्टेट बँकेच्या कॉन्टॅक्ट सेन्टरमधून पुन्हा कॉल प्राप्त करण्यासाठी ७२०८९३३१४३ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल किंवा ग्राहकांना ७२०८९३३१४५ या क्रमांकावर GOLD असं लिहून एसएमएस करावा लागेल.

यानंतर सोनं तारण ठेवून कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेसाठी स्टेट बँक ग्राहकांना फोन करेल आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल.

१८ वर्षावरील कोणतीही व्यक्ती याद्वारे कर्ज घेऊ शकेल. यासाठी त्या वक्तीकडे कमाईचा स्रोत असणं आवश्यक आहे.

या अंतर्गत ग्राहकांना २० हजार रूपयांपासून ५० लाखांपर्यंत कर्ज घेता येणार आहे. सोनं किंवा सोन्याची नाणी तुम्ही तारण ठेवून हे कर्ज घेऊ शकत. यासाठी त्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र आवश्यक आहे.

या कर्जासाठी ग्राहकांकडून कर्जाच्या रकमेच्या ०.२५ टक्के आणि जीएसटी किंमनी किंवा २५० रूपये शुल्क आकारलं जाईल.

योनो मोबाईल अॅपवरून अर्ज केल्यास शुल्क आकारलं जाणार नाही.

यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तसंच यासाठी ७.५ टक्के व्याजदर आकारला जाईल. ज्या ग्राहकांनी स्टेट बँकचं गृहकर्ज घेतलं आहे त्यांच्यासाठी ७.३ टक्क्यांनी हे कर्ज देण्यात येईल.

सोनं तारण कर्जासाठी ३६ महिने, लिक्विड सोनं तारण कर्जासाठी ३६ महिने आणि बुलेट रिपेमेंट सोनं तारण कर्जासाठी १२ महिन्यांचा रिपेमेंट पिरिअड असणार आहे.

कर्जासाठी अर्ज करण्यासाठी दोन फोटोसह, अर्ज, ओळख आणि पत्त्याचा पुरावा, लोन मिळण्याचा कालावधी - डीपी नोट आणि डीपी नोट टेक डिलिव्हरी लेटर, गोल्ड ऑर्नामेंट्स टेक डिलिव्हरी लेटर आणि अरेंजमेंट लेटरची आवश्यकता असणार आहे.