SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना झटका! ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर द्यावा लागणार चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 03:51 PM2021-05-26T15:51:07+5:302021-05-26T16:26:20+5:30

State Bank Of India : खातेधारकांना एटीएममधून एका महिन्यात 4 वेळा विनाशुल्क पैसे काढता येणार आहेत.

देशातील बँका गरिबांच्या खात्यांमधून सेवा शुल्काच्या नावाखाली कमाई करत असल्याचा खुलासा एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे. पीएनबी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या सेव्हिंग खातेधारकांकडून चार्ज वसूल करणार असल्याचं समोर आलं आहे.

बेसिक सेव्हिंग्ज अकाऊंट असलेल्या खातेधारकांना एटीएममधून एका महिन्यात 4 वेळा विनाशुल्क पैसे काढता येणार आहेत. त्याशिवाय जास्त वेळा पैसे काढल्यास 15 रुपये आणि त्यावर जीएसटी शुल्क देखील द्यावं लागणार आहे. स्टेट बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार, बेसिक सेव्हिंग खातेधारक एका महिन्यांत कोणत्याही एटीएममधून चार वेळा मोफत पैसे काढू शकतो. त्यानंतर एसबीआयच्या एटीएमवरुन पैसे काढले तरी त्याला 15 रुपये आणि जीएसटी शुल्क द्यावं लागणार आहे.

1 जुलैपासून हा नियम लागू होणार आहे. बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खात्यांवर आरबीआयच्या नियमानुसार सूट दिली जाते. हे झिरो बॅलन्स अकाऊंट असतं. हे खाते कोणीही काढू शकते.

मिनिमम बॅलन्स देखील ठेवावा लागत नाही. खातेधारकांना एटीएम, इंटरनेट बँकिंग, फंड ट्रान्सफर, केंद्र राज्य सरकारांकडून आलेले अनुदानाचे चेक डिपॉझिट करणे इतर सुविधा असतात. ही सेवा फ्री असते.

आयआयटी बॉम्बेच्या एका रिपोर्टनुसार एसबीआय़कडील बीएसबीडी खातेधारकांची संख्या 12 कोटी आहे. या खात्यामधून सर्व्हिसेसे च्या नावाखाली 9.9 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

बँकाकडून छोटी छोटी रक्कम ही लोकांच्या खात्यातून कापली जाते. आयआयटी बॉम्बेच्या एका रिपोर्टनुसार स्टेट बँक ऑफ इंडियानं बीएसबीडी खातेधारकांच्या खात्यातून गेल्या सहा वर्षात 308 कोटी रुपये कमावले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

स्टेट बँक इंडियामध्ये (State Bank Of India) खाते असेल आणि नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज केला असेल तर ही बाब तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच एसबीआयच्या इतर खातेदारांनाही बँकेचे हे नियम माहीत असणं आवश्यक आहे जेणेकरून आपण भविष्यात डेबिट कार्डसाठी अर्ज केल्यास आपल्याला अडचण होणार नाही.

जेव्हा आपण नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा बँकेकडून एक कन्फर्मेशन येते की, आपले कार्ड पाठवले आहे, मात्र आपल्याला प्राप्त होत नाही. काही दिवसांपूर्वी एका ग्राहकालाही अशाच प्रकारची समस्या आली.

ग्राहकाने बँकेला टॅग केले आणि सोशल मीडियावर विचारले की, एटीएम डिस्पॅच केल्यानंतर डिलिव्हरी होण्यास किती वेळ लागेल. यावर एसबीआयने ट्विटरवरच माहिती दिली असून एटीएम न मिळाल्यास काय करावे हे सांगितले आहे.

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, डेबिट कार्ड इंडिया पोस्टद्वारे वितरीत केले जाते. तसेच बँकेने असा सल्ला दिला आहे की अशा प्रकारच्या डिलिव्हरीबद्दल जाणून घेण्यासाठी पोस्ट ऑफिसशी संपर्क साधला पाहिजे.

जर पोस्ट ऑफिसद्वारे डिलिव्हरी केली गेली नसेल किंवा ती रिटर्न म्हणून मार्क केली गेली असेल तर ती सुरक्षेच्या दृष्टीने ब्लॉक करण्यासाठी बँकेत पाठविली जाईल. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर हे कार्ड ग्राहकांच्या शाखेत पाठवले जाते, तेथून ग्राहक ते कलेक्ट करू शकतात.

बँकेने सांगितले की ही संपूर्ण प्रक्रियेसाठी 10-15 दिवस लागतात आणि ते आपल्या पत्त्यावर देखील अवलंबून असते. बँकेच्या ट्वीटनुसार, तुम्हाला असे झाल्यास तुमची केवायसी कागदपत्रे व पासबुक घेऊन बँक शाखेत जा आणि एटीएम कार्ड कलेक्ट करा.

एसबीआयच्या अनेक खात्यांमधून पैसे वजा केले जात आहेत आणि एसबीआयकडून पैसे डेबिट केले जात आहेत. होय, एसबीआयकडून तुमच्या खात्यातून सर्व्हिस चार्ज 147 रुपये वजा केले जात आहेत.

बँक एटीएम किंवा डेबिट कार्डसाठी मेंटेनन्स चार्ज वजा करते. हे शुल्क बँकेच्या वतीने दरवर्षी बँकेच्या खात्यातून वजा केले जाते. बँकेने स्वतः ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली असून बँकेच्या वतीने शुल्क म्हणून 147.50 रुपये वजा केल्याचे म्हटले आहे.