SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट! लवकर पूर्ण करा 'हे' काम अन्यथा पैशांचे व्यवहार करणं होईल अवघड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 05:08 PM2021-06-02T17:08:50+5:302021-06-02T17:23:01+5:30

State Bank Of India : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकासाठी एक अ‌लर्ट जारी केला आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकासाठी एक अ‌लर्ट जारी केला आहे. येत्या काळात पैशांचे व्यवहार करताना समस्या येऊ नये म्हणून बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांना 30 जूनपूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिकं करुन घ्यावं, अशा सूचना दिल्या आहेत.

सीबीडीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स विभागाने पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढवली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

बँकेच्या सेवांचा कोणत्याही अडचणीशिवाय लाभ घ्यायचा असेल तर पॅन आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावं. पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे असं म्हणत बँकेने ग्राहकांनी सूचना दिली आहे.

पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बंद होऊ शकतं. तुम्हाला कोणताही व्यवहार करता येणार नाही. त्यामुळे 30 जूनपूर्वी पॅन आधार लिंक करुन घ्या, असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी काय प्रक्रिया आहे ते जाणून घेऊया... इनकम टॅक्सची अधिकृत वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in वर जावे लागेल. लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोन बॉक्स दिसतील.

Link Aadhaar चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर आपला आधार क्रमांक टाकावा लागेल. दुसर्‍या बॉक्समध्ये पॅन क्रमांक टाका. तसेच नाव देखील लिहा. एक कॅप्चा कोड पाठवला जाईल तो नीट नमूद करा.

सर्व बॉक्समध्ये माहिती भरल्यानंतर Link Aadhar वर क्लिक करा. यानंतर ते लिंक केलं जाईल. एसएमएसद्वारे पॅन आणि आधार लिंक करता येतं. यासाठी मेसेज बॉक्समध्ये UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN> टाईप करून 567678 किंवा 561561 वर मेसेज पाठवा.

ज्यांनी आपले आधार कार्ड आणि पॅन लिंक केलेले नाहीत, त्यांना आज शेवटच्या तारखेनंतर लिंक केल्यास त्यांना एक हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. याशिवाय पॅन अकार्यक्षम ठरू शकते आणि बँकेची अनेक कामेही अडकू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) मध्ये खाते असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. बँकेतील व्यवहारासंबंधी कोणतेही काम करायचे असेल तर बँकेच्या शाखेत जाण्याची किंवा ऑनलाईन लॉगिन करण्याची गरज नाही.

फक्त एका फोनवर तुमचं काम आता झटपट घरबसल्या होऊ शकतं. एका फोनच्या माध्यमातून तुम्ही घरच्या घरी बँकेची कामं अगदी सहज करू शकता. याची खासियत म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम काढू शकता.

जर, तुम्हाला पैशांची गरज असेल तर बँक प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन पैसे पोहोचवेल करेल. याशिवाय पैसे जमा करायचे असतील तर बँक प्रतिनिधी पैसे जमा करण्याचं देखील काम करू शकतात.

एसबीआयच्या ग्राहकांना यामुळे आपली कामं लवकर करता येणार आहेत. बँकेने सुरू केलेली सुविधा नेमकी काय आहे?, याचा कसा फायदा घ्यायचा? तसेच या खास सर्व्हिसचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया.

आजकाल अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी डोअर स्टेप बँकिंग सुविधा सुरू केलेली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बँक ग्राहकांना घरपोच बँक सेवा दिली जाते. यालाच डोअर स्टेप बँकिंग म्हणतात.

बँक रोख रक्कम ग्राहकांना देणे, ग्राहकांकडून रक्कम स्वीकारणे, चेक जमा करुन घेणे, चेकची मागणी, फार्म 15H स्वीकराणे, डीमांड ड्राफ्ट डिलीव्हरी, टर्म डिपॉजिट सल्ला या शिवाय इतर सेवा देखील ग्राहकांना पुरवल्या जातात. केवायसी कागदपत्रे देखील स्वीकारली जातात.

SBI ने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार दिव्यांग नागरिक आणि ज्यांचं वय 70 वर्षाहून अधिक आहे त्यांच्यासाठी डोअर स्टेप बँकिंग सुरु करण्यात आलं आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे ग्राहकांचा मोबाईल नंबर त्यांच्या खात्याशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे.

बँकेची वेबसाईट, मोबाईल App आणि नेट बँकिगद्वारे तुम्ही डोअरस्टेप बँकिंग सुरू करू शकता. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही https://bank.sbi/dsb या वेबपेजवर भेट देऊ शकता. याशिवाय तुमचं खातं असलेल्या शाखेत देखील फोन करु शकता.