Jio पेक्षा बेस्ट आहे Vi चा हा प्लॅन; 500 रूपयांत 100GB डेटा, Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शनही मोफत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 12:21 PM2021-10-25T12:21:59+5:302021-10-25T12:26:25+5:30

Vodafone Idea Prepaid Recharge Plans : पाहा या प्लॅनमध्ये आणखी कोणते मिळतात बेनिफिट्स. Vodafone-Idea, Reliance Jio आणि Airtel या दूरसंचार कंपन्या आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवे प्लॅन्स लाँच करत आहेत.

Vodafone-Idea, Reliance Jio आणि Airtel या दूरसंचार कंपन्या आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, तसंच आपल्या ग्राहकांना टिकवण्यासाठी नवनवे प्लॅन्स लाँच करत आहेत. सध्या व्होडाफोन आडियाही ही कंपनीदेखील आपल्या ग्राहकांसाठी अनेक आकर्षक प्लॅन्स देत आहे.

सध्या अनेक आकर्षक प्लॅन्ससह कंपनी वीकेंड डेटा रोलओव्हर, आणि बिंज ऑल नाईटसारख्या ऑफर्सही देत आहे. Vi च्या ५०० रूपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना अनेक बेनिफिट्स देत आहे. तसंच रिलायन्स जिओच्या प्लॅन्सच्या तुलनेत हे प्लॅन्स अधिक आकर्षक आहेत.

रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी ४९९ रुपयांचा एक नवा प्लॅन लाँच केला होता. Disney+ Hotstar नं काही दिवसांपूर्वी आपल्या प्लॅन्समध्ये बदल केले होते. त्यानंतर रिलायन्स जिओनंही आपल्या प्लॅनमध्ये बदल केले.

४९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये रिलायन्स जिओ २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा देत आहे. याशिवाय कंपनी ६ जीबी बोनस डेटाही देत आहे. या प्लॅनद्वारे कंपनी बोनस डेटासह एकूण ९० जीबी डेटा ऑफर करत आहे.

कंपनी या प्लॅनसह कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसही ऑफर करत आहेत. यामध्ये रिलायन्स जिओच्या ग्राहकांना Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शनही देण्यात येत आहे. याशिवाय जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, सिक्युरीटी आणि जिओ क्लाऊडचंही मोफत अॅक्सेस देण्यात येत आहे.

Vi आपल्या ग्राहकांना ५०१ रुपयांचा प्लॅन ऑफर करत आहे. कंपनीनं हा प्लॅनही नुकताच लाँच केला आहे. हा प्लॅनदेखील वीकेंड डेटा रोल ओव्हर आणि बिंज ऑल नाईटसह येतो.

या प्लॅनसह ग्राहकांना दररोज 3GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० SMS मिळतात. Vi आपला ५०१ रुपयांचा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह ऑफर करतो.

दरम्यान, या प्लॅनची विशेष बाब म्हणजे ग्राहकांना यासोबत १६ जीबी अतिरिक्त डेटा देण्यात येतो. कंपनी या प्लॅनसोबत एकूण १०० जीबीच डेटा ऑफर करते. तसंच कंपनी आपल्या ग्राहकांना या प्लॅनसोबत Disney+ Hotstar मोबाईल ओन्ली सबस्क्रिप्शन ऑफर करते.

Read in English