Mukesh Ambani: मुकेश अंबानींवर लक्ष्मी मेहेरबान! हात घातला त्या बिझनेसमध्ये नफाच नफा; एवढा की...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 11:51 AM2021-10-23T11:51:19+5:302021-10-23T12:05:46+5:30

Reliance Industries Q2 Result: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या सर्वच उद्योगांमध्ये चांगला नफा कमविला आहे.

मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने चालू आर्थिक वर्षामध्ये जुलै-सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीने आपल्या सर्वच उद्योगांमध्ये चांगला नफा कमविला आहे. चांगली वाढ झाल्याने निव्वळ नफा हा 46 टक्क्यांवरून वाढून 49.2 टक्क्यांवर गेला आहे.

हा नफा 15,479 कोटी रुपयांनी वाढला आहे. फक्त रिलायन्स इंडस्ट्रीजचा रेव्हेन्यू 68.8 टक्क्यांनी वाढला आहे. तो 1,08,750 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा निव्वळ नफा हा 9228 कोटी रुपये झाला आहे.

O2C बिझनेस: या उद्योगात 120,475 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 58.1 टक्क्यांनी जास्त आहे.

ऑईल अँड गॅस: वार्षिक 363% च्या जबरदस्त वाढीसह 1,644 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. सोबत 1,071 कोटी रुपयांचा EBITDA देखील नोंदविण्यात आला आहे.

फॅशन लाईफस्टाईल बिझनेसमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्रॉसरी बिझनेसमध्ये मोठी वाढ झाली आहे.

जियो प्लॅटफॉर्मचा रेव्हेन्यू हा 15.2 टक्क्यांनी वाढून 23,222 कोटी रुपये झाला आहे. तर नफा हा 3,728 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा नफा 23.5 टक्के जास्त आहे.

मीडिया : रिलायन्सला मीडिया उद्योगातून 30.7% टक्क्यांची महसूल वाढ मिळाली आहे. EBITDA देखील 52.4% वाढून 253 कोटी रुपये झाले आहे.

Q2 FY2021-22 रिलायन्सचा डिजिटल आणि न्यू कॉमर्स व्यवसाय नव्या बुलंदीवर आहे. स्टोअर पुन्हा उघडल्यावर वार्षिक आधारावर 2.4 पटींनी वाढ झाली आहे.

रिलायन्स रिटेलचा महसूल दुसऱ्या तिमाहीत 45,426 कोटी रुपये झाला. तो गेल्या वर्षीच्या तुलनेच 10.5 टक्क्यांनी जास्त आहे. नेट प्रॉफिट हे 1,695 कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा हे 74.2 टक्के अधिक आहे.