Realme च्या 'या' स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री; १० सेकंदांमध्ये झाली ११२ कोटींच्या फोनची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 03:07 PM2021-03-10T15:07:14+5:302021-03-10T15:12:52+5:30

पाहा कोणता आहे Realme चा हा फोन

Realme च्या एका स्मार्टफोननं कमालच केली आहे. या स्मार्टफोननं एन्ट्री घेताच अवघ्या काही सेकंदात कंपनीला कोट्यवधी रूपयांचा सेल करून दिला आहे.

Realme GT 5G असं या स्मार्टफोनचं नाव आहे. पहिल्याच सेलमध्ये या स्मार्टफोनची विक्री १०० कोटींच्या पुढे गेली आहे. Realme GT 5G हा कंपनीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे.

Realme GT 5G या स्मार्टफोनची चीनमध्ये किंमत २८९९ युआन म्हणजेच जवळपास ३२ हजार ४७० रूपये इतकी आहे.

पहिल्याच सेलमध्ये या स्मार्टफोनची विक्री १०० दशलक्ष युआन म्हणजे ११२ कोटी रूपयांपर्यंत झाली आहे.

केवळ १० सेकंदांमध्ये कंपनीच्या स्मार्टफोन्सची इतकी विक्री झाली. तसंच Realme नंदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Realme GT 5G हा स्मार्टफोन दोन व्हेरिअंट्समध्ये आला आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत २८९९ युआन म्हणजेच जवळपास ३२,४८० रूपये इतकी आहे.

तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत ३३९९ युआन म्हणजेच जवळपास ३८ हजार रूपये इतरी आहे.

पहिल्या सेलमध्ये बेस व्हेरिअंटची किंमत २७९९ युआन म्हणजेच ३१,३०० रूपये ठेवण्यात आली होती.

तर १२ जीबी रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत ३२९९ युआन म्हणजेच ३६,९९६ रूपये इतकी ठेवण्यात आली होती. Realme नं या दोन्ही व्हेरिअंट्सचे ३५,७२७ आणि ३०,३१२ युनिट्सची विक्री केली.

Realme GT 5G स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंचाचा फुल HD+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारिक Realme UI 2.0 वर चालतो.

फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 हा 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच यासोबत १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजही देण्यात आलंय.

फोटोग्राफीसाठी यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलंय. याचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सेल, सेकंडरी कॅमेरा ८ मेगापिक्सेल वाईड अँगल आणि २ मेगापिक्सेलची मायक्रो लेन्स देण्यात आली आहे.

सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

याशिवाय या स्मार्टफोनमध्ये ४,५०० एनएएची बॅटरी देण्यात आली असून ती ६५ वॅट फास्ट चार्जिंगही सपोर्ट करते.

याशिवाय या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिन्ट कॅमेरा सेन्स देण्यात आला असून Realme GT 5G चं वजन १८६ ग्राम आहे.