झुकरबर्गला मागे टाकत 'ही' झाली अब्जाधीश !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 10:53 PM2018-07-12T22:53:40+5:302018-07-12T22:58:51+5:30

20 वर्षीय अमेरिकन रिअॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनर हिने सर्वात कमी वयात अब्जाधीश होण्याचा विक्रम केला.

कमी वयामध्ये सर्वाधिक कमाईच्या बाबतीत काइली जेनरने फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गलाही मागे टाकले.

आतापर्यंत झुकरबर्ग हा सर्वात तरुण वयात झालेला अब्जाधीश झाला होता.

काइली जेनरने वयाच्या दहाव्या वर्षी 'कीपिंग अप विद द कार्दाशियन' या रिअॅलिटी शोमधून पदार्पण केलं होते.

काइली जेनर किम कर्दाशियनची छोटी बहीण आहे. पाच बहिणींमध्ये काइली जेनर सर्वात लहान आहे.