कोरोनाची दुसरी लाट मागणीसाठी ठरली मोठा झटका : रिझर्व्ह बँक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 09:25 AM2021-05-18T09:25:42+5:302021-05-18T09:51:57+5:30

Reserve Bank of India Bulletin : इंडस्ट्रीयल सेक्टरलाही दुसऱ्या लाटेमुळे मोठं नुकसान; नॉन बँकिंग फायनॅन्शिअल कंपन्यांची क्रेडिट ग्रोथही झाली कमी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मागणीवर मोठा प्रभाव पडल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली.

मागणीच्या तुलनेत पुरवठ्यावर मात्र परिणाम झाला नसल्याचंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं.

गेल्या वर्षीच्या तुलनेत हे संकट इतकं गंभीर नसल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं.

सोमवारी देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून आली. परंतु महासाथीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही ४ हजारांच्या वर होती.

जाणकारांच्या मते ही आकडेवारी भरवसा करण्यासारखी नसून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या ठिकाणी चाचण्यांची व्यवस्थाही पुरेशी नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

"कोरोनाच्या संकटाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागणीत घट झाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसमोर आव्हान उभं राहिलं आहे," असं रिझर्व्ह बँकेनं आपल्या मासिक बुलेटिनमध्ये म्हटलं.

"देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागणीवर परिणाम झाल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं.

याशिवाय लोकांची बचत करण्याच्या प्रवृत्तीत वाढ झाली आणि रोजगाराच्या नव्या संधी कमी झाल्यानं मागणीवर परिणाम झाला आहे.

इन्वेन्टरी जमा असल्यामुळे संपूर्ण पुरवठ्यावर कमी परिणाम झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या केसेसमध्ये घट होताना दिसत आहे आणि त्याचा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील आर्थिक परिस्थिवर परिणाम जाणवण्याची शक्यता नसल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं.

सध्या या बाबात काहीही सांगितलं जाऊ शकत नाही. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत ही स्थिती तितकी गंभीर नसल्याचंही रिझर्व्ह बँकेनं बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.

अनेक राज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर लॉकडाऊन केलं आहे. यासोबतच लोकांनी Work from Home सुरू केल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं.

देशात ऑनलाईन डिलिव्हरी वाढवली आहे, तसंच डिजिटल पेमेंट आणि ई कॉमर्सचा वापरही वाढल्याचं रिझर्व्ह बँकेनं नमूद केलं.

या महिन्याच्या सुरूवातीला रिझर्व्ह बँकेनं कर्ज देणाऱ्या संस्थांना बॅड लोनच्या वाढत्या समस्येतून दिलासा देण्यासाठी अनेक उपायांची घोषणा केली होती.

यासोबतच काही लोकांना आपल्या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी थोडा वेळ देण्याचीही घोषणा केली होती.