Raj Nidimoru Net Worth: 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरु किती आहेत श्रीमंत? चुपचाप केलं असं काम की होतेय चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 08:58 IST
1 / 6Raj Nidimoru Net Worth: दिग्दर्शक राज निदिमोरू आणि अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्रात असलेल्या लिंग भैरवी मंदिरात गुपचूप विवाह केला. ही बातमी वेगाने पसरत असून, या जोडप्याचा विवाह लोकांमध्ये चर्चेचा विषय बनलाय.2 / 6राज निदिमोरू यांनी त्यांचे क्रिएटिव्ह पार्टनर कृष्णा डीके यांच्यासोबत मिळून 'द फॅमिली मॅन', 'गन्स अँड गुलाब्स', 'स्त्री' यांसारखे अनेक यशस्वी चित्रपट आणि वेब सिरीज दिल्या आहेत. त्यांची नेट वर्थ अंदाजे ८५ ते ८९ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.3 / 6राज निदिमोरू यांनी त्यांचे क्रिएटिव्ह पार्टनर कृष्णा डीके यांच्यासोबत मिळून 'द फॅमिली मॅन', 'गन्स अँड गुलाब्स', 'स्त्री' यांसारखे अनेक यशस्वी चित्रपट आणि वेब सिरीज दिल्या आहेत. त्यांची नेट वर्थ अंदाजे ८५ ते ८९ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.4 / 6दुसरीकडे, राज निदिमोरू हेदेखील २०२२ मध्ये त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी श्यामली डे यांच्यापासून विभक्त झाले होते. सामंथा आणि राज यांचे संबंध २०२४ च्या सुरुवातीस अधिक मजबूत झाले. त्यांनी 'द फॅमिली मॅन २', 'सिटाडेल: हनी बनी' आणि आगामी 'रक्त ब्रह्मांड' यांसारख्या प्रोजेक्ट्सवर एकत्र काम केलंय. राज यांनी सामंथाच्या प्रोडक्शन डेब्यू 'शुभम' मध्ये क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणूनही काम केलं आहे.5 / 6राज निदिमोरू यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे तेलुगू भाषिक कुटुंबात झाला. त्यांनी एसव्हीयू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक चे शिक्षण घेतलं जिथे त्यांची भेट कृष्णा डीके यांच्याशी झाली, जे नंतर त्यांचे दीर्घकाळचे क्रिएटिव्ह पार्टनर बनले. त्यानंतर दोघंही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील पुढील शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी अमेरिकेला गेले.6 / 6डेली जागरणच्या एका रिपोर्टनुसार, राज निदिमोरू यांची एकूण संपत्ती म्हणजेच नेट वर्थ अंदाजे ८५ ते ८९ कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. परंतु, त्यांच्या अतिरिक्त मालमत्ता किंवा प्रति प्रोजेक्ट फीबद्दल अधिक माहिती सार्वजनिक नाही. हा आकडा दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून त्यांची एकूण कमाई दर्शवतो.