२५ वर्षात तुमच्या मुलांना बनवा करोडपती; ‘या’ सरकारी योजनेत पैसे गुंतवा मिळेल हमखास गॅरेंटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 02:27 PM2020-05-12T14:27:05+5:302020-05-12T14:37:57+5:30

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ ही एक छोटी छोटी बचत योजना आहे ज्यात कलम ८० सी च्या अंतर्गत इन्कम टॅक्समध्ये फायदाही मिळतो. फंडात दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे, ज्यात व्याज आणि मुदतपूर्ती ही दोन्ही करमुक्त असतात.

आपणास माहिती आहे का? कोणतीही व्यक्ती आपल्या मुलाच्या नावावरसुद्धा पीपीएफ खाते उघडू शकते. मुलाचे वय १८ वर्ष होईपर्यंत पालकांनी हे खाते पहावे. वयाच्या १८ व्या नंतर तो हे खाते स्वतः वापरु शकेल. मुलाच्या नावे उघडलेल्या खात्यावर कर्ज आणि अंशतः पैसे काढण्याची सुविधा देखील आहे.

पीपीएफ खात्याचा कालावधी १५ वर्षे आहे. पण अशी सुविधा आहे की ती आणखी ५-५ वर्षांसाठी वाढविली जाऊ शकते. या खात्यात किमान आणि जास्तीत जास्त जमा करण्याची मर्यादा ५०० ते दीड लाख रुपये इतकी आहे. परंतु जर पीपीएफ खाते पालकांच्या नावेही उघडले असेल तर जास्तीत जास्त रक्कम दोन्ही खाती एकत्रितपणे विचारात घेण्यात येईल. असे नाही की दोन्ही खात्यात वर्षाला दीड लाख जमा करता येतील.

जर तुम्ही पीपीएफ खात्यात मुलाच्या नावावर पैसे जमा केले तर त्यावरही आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कराचा लाभ दिला जाईल. जेव्हा पाल्य १८ वर्षांचा होईल तेव्हा एक अर्ज देऊन ते खाते त्याच्याकडे वळते करु शकतो. जेणेकरुन हे खाते तो ऑपरेट करू शकतो.

जास्तीत जास्त मासिक ठेव: (१२,५०० रुपये) जास्तीत जास्त वार्षिक ठेवः (१,५०,००० रुपये) व्याज दर: (७.१ टक्के वार्षिक) १५ वर्षानंतर मॅच्युरिटीची रक्कमः (४०,६८,२०९ रुपये) एकूण गुंतवणूक: (२२,५०,०००) व्याज लाभः (१८,१८,२०९ रुपये)

जास्तीत जास्त मासिक ठेव: (१२,५०० रुपये) जास्तीत जास्त वार्षिक ठेवः (१,५०,००० रुपये) व्याज दर: (७.१ टक्के वार्षिक) २५ वर्षांनंतर मॅच्युरिटीः (१.०३ कोटी) एकूण गुंतवणूक: (३७,५०,०००) व्याज लाभ: (६५,५८,०१५ रुपये)

म्हणजेच, जर १५ वर्षांनंतर, योजनेत ५-५ वर्षांसाठी २ वेळा वाढ केली गेली तर २५ वर्षांनंतर आपल्या मुलाच्या नावे १ कोटीची रक्कम तयार केली जाईल.