Post Office मध्ये केवळ 'इतक्या' दिवसांत होतील पैसे दुप्पट; पाहा कोणत्या योजनेवर मिळतंय किती व्याज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 11:44 AM2021-05-26T11:44:24+5:302021-05-26T11:48:24+5:30

Post Office Investment Schemes : सध्या पोस्ट ऑफिसमध्ये अनेक अशा स्कीम्स सुरू आहेत ज्यात उत्तम रिटर्न मिळतात.

सध्या एकीकडे बँकांकडून व्याजदरात कपात केली जात आहे, तर दुसरीकडे अनेक जण कमी वेळात कोणत्या ठिकाणाहून अधिक रिटर्न्स मिळतील या विचारात असतात. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक स्कीम्स आहेत ज्यामध्ये तुमचा पैसा हा दुप्पट होतो. उत्तम रिटर्न्ससह पोस्ट ऑफिस सुरक्षितही मानलं जातं.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीमच्या गुंतवणुकीचा कालावधी १ ते ३ वर्षांचा आहे. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटच्या वेळी ५.५ टक्क्यांचा व्याजदर देतं.

जर कोणी या स्कीममध्ये पैसे गुंतवू इच्छित असेल तर त्याचा पैसा हा १३ वर्षांनंतर दुप्पट होतो. या स्कीममध्ये पाच वर्षासाठीदेखील पैसे गुंतवता येतात.

पाच वर्षांसाठी ग्राहकांना ६.७ टक्क्यांचं व्याज देण्यात येतं. अशा परिस्थितीत तुमचे पैसे १० वर्षे आणि ९ महिन्यांमध्ये दुप्पट होतील.

पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग स्कीमही एक उत्तम स्कीम मानली जाते. अशात जर कोणी गुंतवणूक करत असेल तर त्या ग्राहकांना ४.४ टक्क्यांचं व्याज दिलं जातं. अशा परिस्थितीत १८ वर्षांनंतर तुमचे पैसे दुप्पट होतात.

मोठ्या प्रमाणात लोक पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये पैसा गुंतवत असतात. जर अशा स्कीममध्ये पैसे गुंतवले तर १२ वर्षे ५ महिन्यांमध्ये तुमचे पैसे दुप्पट होतात. आरडीवर यावेळी पोस्ट खात्याकडून ५.८ टक्क्यांचं व्याज दिलं जातं.

सध्यो पोस्ट ऑफिसमध्ये मंथली इन्कम स्कीममध्ये ६.६ टक्क्यांचं व्याज देण्यात येतं. या स्कीममध्ये १० वर्षांनंतर तुमचे पैसे दुप्पट होतात.

पोस्ट ऑफिस सीनिअर सिटीझन स्कीममध्ये ग्राहकांना ७.४ टक्क्यांचं व्याज दिलं जातं. जर या स्कीममध्ये ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केली तर त्यांचे पैसे ९ वर्ष आणि ७ महिन्यांमध्ये दुप्पट होतात.

पीपीएफकडे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं जातं. अशात जर तुम्ही पैसे गुंतवले तर १० वर्षांनंतर तुमचे पैसे दुप्पट होतात. या स्कीममध्ये सध्या ७.१ टक्क्यांचं व्याज दिलं जातं.

सुकन्या समृद्धी योजनाही ग्राहकांना आकर्षित करत आहे. यामध्ये सध्या ग्राहकांना ७.६ टक्क्यांचं व्याज दिलं जातं आहे. जर या स्कीममध्ये पैसे गुंतवले तर ९ वर्ष ६ महिन्यांमध्ये पैसे दुप्पट होतात. मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ही स्कीम सुरू करण्यात आली आहे.

पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्रीमवर यावेळी उत्तम रिटर्न मिळत आहे. पोस्ट ऑफिस सध्या या स्कीमवर ६.८ टक्क्यांचं व्याज देत आहे. या व्याजदराप्रमाणे १० वर्षे ७ महिन्यांनी पैसे दुप्पॉ होतात.