Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम! PM मोदीनींही केली आहे गुंतवणूक, तुम्हीही घेऊ शकता फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 09:24 PM2022-10-04T21:24:02+5:302022-10-04T21:29:14+5:30

पंतप्रधान मोदींनी लाइफ इन्शुरन्स आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

जर छोटी गुंतवणूक करून नफा कमावण्याची आपली इच्छा असेल, तर पोस्ट ऑफिस हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील पोस्ट ऑफिस स्कीम्समध्ये गुंतवणूक करतात. पंतप्रधान मोदींनी लाइफ इन्शुरन्स आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

आंकडेवारीनुसार, जून 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी NSC मध्ये 8 लाख 43 हजार 124 रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच, लाइफ इंन्शुरन्समध्ये त्यांनी 1 लाख 50 हजार 957 रुपयांचा प्रीमियम जमा केला होता. तर सविस्तर जाणून घेऊयात या स्कीम बद्दल...

नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट - जर आपली झिरो रिस्क गुंतवणूक करायची इच्छा असेल, तर आपण पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करायला हवी. सुरक्षित आणि सरकारी योजनेत गुंतवणुकीसाठी आपण नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक करू शकता. ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. कारण ती पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीमचाच एक भाग आहे आणि देशाचे पंतप्रधान स्वतः त्यात गुंतवणूक करतात.

कशा पद्धतीने करावी गुंतवणूक? - नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेटमध्ये (National Savings Certificate) किमान पाच वर्षांचा लॉक-इन पिरियड असतो. अर्थात एकदा गुंतवणूक केल्यानंतर थेट पाच वर्षांनंतरच आपण आपले पैसे काढू शकता. NSC मध्ये तीन पद्धतीने गुंतवणूक केली जाऊ शकते.

1. सिंगल टाइप - या पद्धतीने आपण स्वतःसाठी अथवा एखाद्या अल्पवयीन व्यक्तीसाठी गुंतवणूक करू शकता. 2. जॉइंट ए टाइप - अशा पद्धतीचे सर्टिफिकेट कुणीही दोन व्यक्ती एकत्रितपणे घेऊ शकतात. अर्थात दोन जण एकत्रितपणे गुंतवणूक करू शकतात. 3. जॉइंट बी टाइप - यात दोन जण गुंतवणूक करू शकतात. मात्र, मॅच्युरिटी (Maturity)नंतर पैसे केवळ कुण्याही एकाच गुंतवणुकदाराला दिले जातात.

किती गुंतवणूक करू शकता? - पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा व्याज दर सध्या 6.8 टक्के एवढा आहे. या योजनेत आपण किमान 1,000 रुपयांची गुंतवणूक करू शकता आणि 100 च्या मल्टीपलमध्येही पैसे टाकू शकता. यात गुंतवणुकीसाठी कसल्याही प्रकारची मर्यादा नाही.

टॅक्समध्येही सूट - आपण NSC मध्ये गुंतवणूक केल्यास, आपल्याला इनकम टॅक्सच्या कलम 80C (Section 80C of Income Tax) अंतर्गत दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यं गुंतवणूक करून टॅक्समध्ये सूटही मिळवता येऊ शकते.