2022मध्ये जगभरात वाजणार मोदी सरकारच्या यशाचा डंका; अमेरिका, चीन, रशिया सर्वांना मागे टाकणार भारत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 04:31 PM2021-10-13T16:31:06+5:302021-10-13T16:54:22+5:30

Narendra Modi government success in 2022 : भारताचा विकास दर 2022 मध्ये अमेरिका, चीन, जपान, रशियासारख्या देशांपेक्षाही अधिक असेल, असा अंदाज खुद्द आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) व्यक्त केला आहे.

2022 हे वर्ष केवळ मोदी सरकारसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीयांसाठीच आनंदाचे ठरणार आहे. कारण, अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर, जगभरात भारताच्या यशाचा डंका वाजू शकतो. कोरोना काळात जीडीपीमध्ये सर्वात मोठी घसरण सहन करणाऱ्या भारताचा विकास दर 2022 मध्ये अमेरिका, चीन, जपान, रशियासारख्या देशांपेक्षाही अधिक असेल, असा अंदाज खुद्द आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) जाहीर केलेल्या ताज्या अंदाजानुसार, भारताची अर्थव्यवस्था 2021 मध्ये 9.5 टक्के आणि 2022 मध्ये 8.5 टक्के वाढणे अपेक्षित आहे. 2022 मध्ये भारताचा विकास दर हा चीनच्या 5.6%, अमेरिकेच्या 5.2%, जपानच्या 3.2%, रशियाच्या 2.9% पेक्षाही फार अधिक असेल.

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांनी खाली आली होती. IMF च्या ताज्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये (WEO) भारताच्या वाढीचा अंदाज यावर्षी जुलैमध्ये जाहीर केलेल्या आपल्या गत अंदाजा प्रमाणे स्थिर ठेवला आहे. मात्र, तो एप्रिलच्या अंदाजापेक्षा 1.6 टक्के कमी आहे.

अमेरिकेचा विकासदर या वर्षी सहा टक्के आणि पुढील वर्षात 5.2 टक्के वाढण्याचा अंदाज आहे. या अंदाजानुसार, चीनची अर्थव्यवस्था 2021मध्ये आठ टक्के आणि 2022 मध्ये 5.6 टक्के दराने वाढू शकते.

संपूर्ण जगाचा विचार करता, IMF आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वीच जाहीर झालेल्या ताज्या WEO नुसार, जागाचा विकासदर 2021 मध्ये 5.9 टक्के तर 2022 मध्ये 4.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे, की जुलै महिन्यातील पूर्वानुमानाच्या तुलनेत, 2021 साठी जागतिक वाढीच्या अंदाजात किरकोळ सुधारणा करून तो 5.9 टक्के करण्यात आला आहे आणि 2022 साठी 4.9 टक्क्यांवर स्थिर आहे.

IMF Projections: 2022

IMF Projections: 2022