PM Kisan Scheme: जर तुम्ही शेतकरी असाल तर 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी असे करा फ्री रजिस्ट्रेशन...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 11:10 AM2021-02-05T11:10:33+5:302021-02-05T11:25:17+5:30

नवी दिल्ली : शेतकर्‍यांच्या हितासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवित आहे. लाखो शेतकर्‍यांना या योजनांचा थेट फायदा होत आहे. यापैकी एक योजना म्हणजे केंद्र सरकारची पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Maan Dhan Scheme).

या योजनेंतर्गत सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना जशी दरमहा पेन्शन मिळते, तशी शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन मिळते. पंतप्रधान किसान मानधन योजनेंतर्गत वयाच्या 60 व्या वर्षांनंतर पेन्शनची तरतूद आहे.

18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकेल. हा पेन्शन फंड भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (एलआयसी) आहे.

या योजनेत वयानुसार महिन्याला पैसे भरल्यानंतर वयाच्या 60 वर्षानंतर महिन्याला 3000 किंवा वर्षाला 36000 रुपये पेन्शन दिली जाते. यासाठी मासिक देय 55 ते 200 रुपयांपर्यंत आहे.

आतापर्यंत 21 लाखाहून अधिक शेतकरी या योजनेत सामील झाले आहेत. शेतकरी पेन्शन योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी भाग घेऊ शकतात. ज्यांच्याजवळ जास्तीत जास्त 2 हेक्टर जमीन असलेले शेतकरी पेन्शन योजनेत भाग घेऊ शकतात.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे मासिक सुमारे 55 ते 200 रुपयांपर्यंत देय द्यावे लागेल.

या योजनेंतर्गत शेतकर्‍याचे योगदान सरकारने दिलेल्या योगदाना इतकेच असेल. म्हणजेच पीएम किसान खात्यात आपले देय 55 रुपये असेल तर सरकार सुद्धा तुमच्या खात्यात 55 रुपयांचे देय देईल.

यासाठी शेतकर्‍याला जवळच्या सामान्य सेवा केंद्रात (सीएससी) जाऊन आपली नोंदणी करावी लागेल. यासाठी शेतकऱ्याला आधार कार्ड आणि शेतीसंबंधी कागदपत्रांची प्रत घ्यावी लागेल.

यासह, शेतकऱ्याचे 2 पासपोर्ट आकाराचे फोटो आणि बँक पासबुक देखील आवश्यक असेल. नोंदणीदरम्यान, शेतकऱ्याला पेन्शन युनिक नंबर आणि पेन्शन कार्ड दिले जाईल. यासाठी स्वतंत्र शुल्क नाही.

मासिक देय शेतकऱ्यांच्या वयावर आधारित असते. उदाहरणार्थ, जर 18 व्या वर्षी योजनेत सहभाग घेतल्यास देय 55 रुपये किंवा वर्षाला 660 रुपये असते.

तसेच, जर 40 व्या वर्षी योजनेत सहभाग घेतल्यास महिन्याला 200 रुपये किंवा वर्षाला 2400 रुपये देय भरावे लागेल.

जर एखाद्या शेतकऱ्याला योजना मध्येच सोडायची असेल तर तो त्याचे पैसे बुडणार नाहीत. योजनेतून बाहेर पडेपर्यंत जमा झालेल्या पैशांवर बँकांच्या बचत खात्याइतकेच व्याज मिळेल.

जर पॉलिसीधारक शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला 50 टक्के रक्कम मिळते.

Read in English