पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' कागदपत्राशिवाय नवीन नोंदणी होणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 12:55 PM2022-06-26T12:55:07+5:302022-06-26T12:59:56+5:30

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेत (PM Kisan Yojana) होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने हा मोठा बदल केला आहे.

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेद्वारे केंद्रातील मोदी सरकार (Modi Government Scheme) शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते.

या योजनेद्वारे दिलेली आर्थिक मदत सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये ट्रान्सफर केले जातात, परंतु आता या योजनेच्या नोंदणीच्या नियमांमध्ये (PM Kisan Scheme Registration) मोठे बदल करण्यात आले आहेत.

आता सर्व शेतकऱ्यांना नोंदणी करताना त्यांच्या रेशनकार्डची (Ration Card) माहिती द्यावी लागणार आहे. पीएम किसान योजनेत (PM Kisan Yojana) होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने हा मोठा बदल केला आहे.

आता तुम्हाला नोंदणी करताना रेशन कार्ड (Documents Required for PM Kisan Scheme) अपलोड करावे लागतील, अन्यथा तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही. यासोबतच सरकारने योजनेचे ई-केवायसी करणेही बंधनकारक केले आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची पीडीएफ प्रत पोर्टलवर (PM Kisan Portal) अपलोड करावी लागेल. यासोबतच आधार कार्ड, बँक पासबुक (Bank Account Details) आदींच्या हार्ड कॉपी जमा करण्याची अटही काढून टाकण्यात आली आहे.

यानंतर तुम्हाला फक्त रेशन कार्ड अपलोड आणि ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

सरकारने शेतकऱ्यांना ई-केवायसी (PM Kisan Scheme e-KYC) घेण्यासाठी 31 जुलै 2022 पर्यंत वेळ दिला आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचाही लाभ मिळालेला नाही. अशा प्रकारे, जर तुम्ही केवायसी केले नसेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करा.