PM Kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील 4,000 रुपये! यासाठी करावे लागेल फक्त 'हे' काम...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 11:19 AM2021-05-01T11:19:11+5:302021-05-01T11:29:20+5:30

PM Kisan : नोंदणी केली नसेल तर ती 30 जूनच्या आधी करा, अन्यथा...

नवी दिल्ली : जर तुम्ही अद्याप पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi scheme) नोंदणी केली नसेल तर ती 30 जूनच्या आधी करा. यामुळे या वर्षाचे दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा होतील.

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या नियमांनुसार, तुम्ही जूनमध्ये अर्ज केल्यास आणि तुमचा अर्ज मंजूर झाल्यास जून किंवा जुलैमध्ये तुम्हाला 2000 रुपये मिळतील. त्यानंतर, ऑगस्टमध्ये 2000 रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यातही येईल.

सध्या देशातील 11 कोटीहून अधिक लोक पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या एप्रिल-जुलैच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. हप्ता मिळवण्यासाठी तुमच्याकडे बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे.

आपले बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या हप्त्यावरून अनेक बदल करण्यात आले आहेत.

ज्यावेळी पहिला हप्ता देण्यात आला, त्यावेळी आधार क्रमांक आवश्यक नव्हता, दुसर्‍या हप्त्यापासून आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला. मात्र आसाम, मेघालय, जम्मू-काश्मीरला यातून सूट देण्यात आली आहे.

तुम्ही आपली कागदपत्रे pmkisan.gov.in या वेबसाइटवर अपलोड करू शकता. या वेबसाइटवर तुम्ही फार्मर कॉर्नरच्या पर्यायावर जा आणि तुम्हाला आधार कार्ड जोडायचा असेल तर त्यासाठी तुम्ही Edit Aadhaar Detailच्या ऑप्शनवर क्लिक करुन अपडेट करू शकता.

असे तपासा तुमचे नाव : १) सर्वात आधी तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल. २) वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला Farmers Corner चा ऑप्शन दिसेल.

३) Farmers Corner सेक्शनमध्ये तुम्हाला Beneficiaries List च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. ४) त्यानंतर तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.

५) यानंतर, तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसून येईल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना 2000-2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये देते. त्याअंतर्गत दर वर्षाचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत दिला जातो.