PMAY : घर खरेदी करण्यावर ३१ मार्चपर्यंतच मिळणार २.६७ लाखांची सूट; पात्र असल्यास 'असा' करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 02:34 PM2021-03-23T14:34:02+5:302021-03-23T14:39:41+5:30

Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजना सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे. ज्याचा लाभ ३१ मार्च २०२१ पर्यंत घेता येईल.

पंतप्रधान आवास योजना ही भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेचा उद्देश लोकांना शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये कमी किंमतीत घर उपलब्ध करून देणं हा आहे.

या अंतर्गत पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना CLSS किंवा क्रेडिट लिंक्ड अनुदान देण्यात येते. याचाच अर्थ घर खरेदी करण्यासाठी होम लोनवर ग्राहकांना अनुदान मिळतं.

या अंतर्गत ग्राहकांना सर्वाधित २.६७ लाख रूपयांचं अनुदान देण्यात येतं. ही केंद्र सरकारद्वारे चालवण्यात येणारी एक योजना आहे.

याचा फायदा ग्राहकांना केवळ ३१ मार्च २०२१ पर्यंत घेता येईल. याचाच अर्थ या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ग्राहकांसाठी अवघे काही दिवस उरले आहेत.

३१ मार्च नंतर ग्राहकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येणार नाही.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्याच लोकांना लाभ मिळेल ज्यांचं वार्षिक उत्पन्न ६ लाख ते १८ लाख रूपयांच्या दरम्यान असेल.

तर दुसरीकडे ३ लाख ते ६ लाख रूपये उत्पन्न असलेल्या लोकांना EWS आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांना LIG, ६ ते १२ लाख रूपये उत्पन्न असलेल्या लोकांना MIG1 आणि १२ ते १८ लाख रूपये उत्पन्न असलेल्या लोकांना MIG2 या ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे.

जर तुमचं उत्पन्न वर्षाला ६ लाख रूपये आहे, तर तुम्हाला कर्जावर ६.५ टक्के क्रेडिट लिंक्ड अनुदान मिळेल.

ज्यांचं उत्पन्न वर्षाला १२ लाख रूपयांपर्यंत आहे त्यांना वर्षाला ९ लाख रूपयांपर्यंतच्या कर्जावर ४ टक्के व्याज अनुदान मिळेल.

तसंच १८ लाख रूपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना १२ लाख रूपयांच्या कर्जावर ३ टक्के व्याज अनुदान मिळेल.

यासाठी असलेली एक महत्त्वाची अट म्हणजे अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचं भारतात पक्कं घर असू नये.

याशिवाय या योजनेचा लाभ कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं यापूर्वी घेतलेला असू नये.

याशिवाय या योजनेचा लाभ कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं यापूर्वी घेतलेला असू नये. जर तुमचं लग्न झालं असेल तर एकट्यानं किंवा दोघांनी मिळूनही अर्ज करण्याची परवानगी आहे. यासाठी एकच अनुदान देण्यात येईल.

यासाठी ग्राहकांना ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, लायसन्स, मतदान ओळखपत्र किंवा सरकारकडून जारी करण्यात आलेल्या ओळखपत्रांचा वापर करता येऊ शकतो.

यासाठी ग्राहकांना ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, लायसन्स, मतदान ओळखपत्र किंवा सरकारकडून जारी करण्यात आलेल्या ओळखपत्रांचा वापर करता येऊ शकतो. याशिवाय उत्पन्नाचा पुरावा म्हणून ६ महिन्यांचं बँक स्टेटमेंट, आयटीआर आणि २ महिन्यांची सॅलरी स्लीप द्यावी लागेल.

तसंच प्रॉपर्टी प्रुफ म्हणून सेल्स डीड, अॅग्रीमेंट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि पैसे दिल्याची रसिटही द्यावी लागेल.

यासाठी ग्राहकांना या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा https://pmaymis.gov.in/ या संकेतस्थळावर जावं लागेल.

जर तुम्ही LIG, MIG किंवा EWS कॅटेगरीत येता तर अन्य ३ कंपोनन्ट्सवर क्लिक करा. पहिल्या कॉलममध्ये आधार क्रमांक तर दुसऱ्या कॉलममध्ये आपलं नाव भरा

यानंतर जे पेज ओपन होईल त्यात पूर्ण माहिती भरा. त्यानंतर खाली माहितीची खात्री करण्यासाठी असलेल्या बॉक्सवर क्लिक करा.

माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा कोड दिसेल. तो भरल्यानंतर तुम्ही तो फॉर्म सबमिट करा.