66 पैशांच्या स्टॉकचा धमाका, एका महिन्यात पैसा डबल...! खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, सातत्यानं लागतंय अप्पर सर्क्रिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 15:44 IST2025-12-07T15:36:41+5:302025-12-07T15:44:32+5:30
Penny Multibagger Stock: बीएसईवर कंपनीचे मार्केट कॅप 123.07 कोटी रुपये आहे.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्समध्ये एकूणच घसरण नोंदवली गेली. मात्र, या घसरणीतही काही स्टक्सने आपला गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. यांपैकीच एक म्हणजे, जीवी फिल्म्स लिमिटेड (GV Films Ltd) चा पेनी स्टॉक. एक रुपयापेक्षाही कमी किमतीचा हा शेअर शुक्रवारी अपर सर्किटसह 66 पैशांवर बंद झाला.

या मल्टीबॅगर स्टॉकला गेल्या काही दिवसांत सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरने 100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. एक महिन्यापूर्वी 32 पैसे असलेला हा शेअर आज 66 पैशांवर पोहोचला आहे.

अर्थात या शेअरवे आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 106% चा तगडा परतावा दिला आहे. जर गेल्या एका महिन्यापूर्वी एखाद्या व्यक्तीने या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज तिचे मूल्य दुप्पटहून अधिक झाले असते.

सध्या 66 पैशांवर असलेला या शेअरची किंमत अद्यापही 52 आठवड्यांच्या खाली आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक 82 पैसे एढा आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा शेअर या उच्चांकावर पोहोचला होता.

महत्वाचे म्हणजे, विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात 4 नोव्हेंबर रोजी हा शेअर त्याच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच ३० पैशांवर होता. येथून या शेअरने जबरदस्त उसळी घेतली आहे.

काय करते कंपनी? - जीवी फिल्म्स लिमिटेड ही एक भारतीय मीडिया कंपनी असून, चित्रपट निर्मिती, प्रदर्शन आणि नव माध्यम क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीने 80 आणि 90 च्या दशकात 'अग्नि नचथिराम' आणि 'अंजलि' सारखे प्रसिद्ध तमिळ चित्रपट बनवले आहेत. बीएसईवर कंपनीचे मार्केट कॅप 123.07 कोटी रुपये आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)


















