Online Banking : चुकून दुसऱ्याच्या अकाउंटवर गेले पैसे? एका झटक्यात परत मिळतील, जाणून घ्या कसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 05:04 PM2022-05-17T17:04:37+5:302022-05-17T17:20:40+5:30

कधीकधी बँकिंग फ्रॉडही होते. जर आपल्याकडूनही एखाद्या चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असतील तर, ती रक्कम आपल्याला कशा प्रकारे परत मिळेल, जाणून घ्या...

जर आपल्याकडून चुकून दुसऱ्याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले असतील, तर ते आपल्याला सहजपणे परत मिळू शकतात. खरे तर मोबाईल बँकिंगमध्ये अनेक वेळा चुकीच्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर होतात. याशिवाय, कधीकधी बँकिंग फ्रॉडही होते. जर आपल्याकडूनही एखाद्या चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असतील तर, ती रक्कम आपल्याला कशा प्रकारे परत मिळेल, जाणून घ्या...

अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील - चुकीच्या खात्याव पैसे ट्रान्फर झाले असल्यास यासंदर्भात तातडीने आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि त्यांना माहिती द्या. याच बरोबर कस्टमर केअरलाही कॉल करून संपूर्ण माहिती द्या.

जर बँकेने आपल्याकडे ई-मेलद्वारे माहिती मागितली असे, तर त्यांना इमेलद्वारे चुकून झालेल्या ट्रांझेक्शनची संपूर्ण माहिती द्या. तसेच, ट्रांझेक्शनची तारीख, वेळ, आपला अकाउंट नंबर आणि ज्या खात्यात चुकून ट्रांझेक्शन झाले आहे, त्या खात्याची माहिती द्या.

पैसे परत मिळण्यासाठी किती वेळ लागू शखतो - खरे तर या संपूर्ण प्रक्रियेनंतर, आपल्याला तत्काळ पैसे परत मिळू शकतात. पण अनेक वेळा, यासाठी 2 महिन्यांपर्यंतचा कालावधीही लागतो.

कुठल्या शहरातील कुठल्या ब्रँचच्या कुठल्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झले आहेत, यासंदर्भातही आपण आपल्या बँकेकडून माहिती मिळवू शकता. याशिवाय आपण ब्रँचशी बोलून पैसे परत मिळविण्याचा प्रयत्नही करू शखता.

यानंतर बँक, ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले असतील, त्या व्यक्तीच्या बँकेला सूचना देते. यानंतर संबंधित बँक, त्या व्यक्तीकडे चुकून ट्रान्सफर झालेले पैसे परत करण्याची परवानगी मागेल.

दुसरी पद्धतही वापरू शकता - याशिवाय आपण कायद्याची मदतही घेऊ शकता. ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून ट्रांझेक्शन झाले आहे, त्या व्यक्तीने पैसे परत करण्यास नकार दिला तर आपण, तिच्या विरोधात न्यायालयात गुन्हाही दाखल करू शकतात. संबंधिताने पैसे परत न केल्यास हा अधिकार रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या उल्लंघनासंदर्भात असतो.

महत्वाचे म्हणजे, आपल्याकडून चुकून कुण्या दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे गेले तर आपल्या बँकेला लवकरात लवकर पाऊल उचलावे लागेल, असे निर्देश RBI ने सर्व बँकांना दिले आहेत.