Nureca IPO : १५ फेब्रुवारीला लाँच होणार १०० कोटींचा आयपीओ, पाहा काय असेल प्राईज बँड, लॉट साईज

By जयदीप दाभोळकर | Published: February 9, 2021 01:34 PM2021-02-09T13:34:34+5:302021-02-09T13:49:06+5:30

Nureca IPO Launch Updates: १५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान खुला राहणार आयपीओ

गेल्या काही दिवसांमध्ये आयपीओमध्ये गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक फायद्याची ठरत असल्याचं दिसून येत आहे. २०२१ या नव्या वर्षात एका मागोमाग एक नवे आयपीओ लाँच होत आहेत.

आतापर्यंत आयपीओमध्ये गुंतवणूक केली नसेल तर आता एक नवा आयपीओ लाँच होणार आहे.

१५ फेब्रुवारी रोजी न्यूरेका लिमिटेडचा १०० कोटी रूपयांचा आयपीओ लाँच होणार असून तो १७ फेब्रुवारीपर्यंत खुला राहणार आहे.

यासाठी ३९६ ते ४०० रूपये प्रति शेअर प्राईज बँड ठरवण्यात आला आहे. हा शेअर बीएसई आणि एनएसई दोन्ही इंडेक्सवर लिस्ट केला जाईल.

कंपनीनं १० रूपयांच्या फेस व्हॅल्यूवर प्रति शेअर प्राईज बँड ३९६ ते ४०० रूपये इतका ठेवला आहे, आयपीओच्या एका लॉटमध्ये ३५ शेअर्स असतील.

याचाच अर्थ गुंतवणूकदारांना कमीतकमी १४ हजार रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसंच याच गुणाकारात आणखीही लॉट गुंतवणूकदारांना घेता येतील.

न्यूरेका लिमिटेडच्या आयपीओमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी ७५ टक्के हिस्सा आरक्षित ठेवला आहे.

तर किरकोळ गुंतवणूदारांसाठी १० टक्के हिस्सा आरक्षित आहे. तर दुसरीकडे नॉन कॅटेगरीसाठी १५ टक्के हिस्सा आरक्षित ठेवण्यात आला आहे.

५० लाख रूपयांचे शेअर्स कंपनीकडून आपल्या योग्य कर्मचाऱ्यांसाठीही आरक्षित ठेवण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना प्रति शेअर २० रूपयांची सूटही देण्यात येईल.

३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीकडे एकूण १०२.४८ कोटी रूपयांची एकूण असेट्स होते.

तर कंपनीचं एकूण उत्पन्न १२२.९७ कोटी रूपये होते. न्यूरेकाचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स ३६.१८ कोटी रूपये इतकं होतं.

आयपीओमधून मिळणारी रक्कम कंपनी आपल्या व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. तर जनरल कॉर्पोरेट परपझसाठीही कंपनी या रकमेचा वापर करेल.

सौरभ गोयल हे या कंपनीचे प्रमोटर आहेत. न्यूरेका लिमिटेड हेल्थकेअर आणि वेलनेस प्रोडक्ट डिस्ट्रिब्यूटर आहे.

कपनीचं ध्येय आपल्या ग्राहकांना बेस्ट क्वालिटी, ड्युरेबल आणि इनोव्हेटिव्ह टूल्स देत त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये सुधारणा होणं हे आहे.

कंपनीकडे वेल डायव्हर्सिफाय पोर्टफोलियो असून यात क्रॉनिक डिझिज प्रोडक्ट, ऑर्थोपेडिक्स प्रोडक्ट, मदर अँड चाईल्ड प्रोडक्ट, न्यूट्रिशन्स सप्लिमेंट आणि लाईफस्टाईल पोडक्ट्स आहेत.