नोकियाची भन्नाट ऑफर, स्मार्टफोनवर 'स्मार्टफोन' फ्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 08:55 AM2020-06-22T08:55:33+5:302020-06-22T09:01:12+5:30

एचएमडी ग्लोबलेन आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट स्मार्टफोन लाँच केला आहे. या ऑफरद्वारे नोकिया 7.2 स्मार्टफोन खरेदीवर ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

नोकिया 7.2 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्मार्टफोन केस मोफत मिळणार आहे. त्यासोबतच, या फोनसह एक स्मार्टफोनही मोफत देण्यात येत आहेत.

नोकिया 3.1 स्मार्टफोनच्या खरेदीवर नोकिया सी1 हा फोन मोफत मिळणार आहेत. नोकियाची ही भन्नाट ऑफर केवळ इथंच संपत नाही. तर, ग्राहकांना एक हुडीही मोफत मिळविण्याची संधी आहे.

नोकिया 7.2 चा 6 रॅम व्हेरियंट मोबाईल खरेदी केल्यावर, कंपनीकडून स्मार्टफोन केस, हुडी आणि नोकिया सी 1 मोफत मिळणार आहे. मात्र, ही ऑफर फिलिपिन्सच्या ग्राहकांना आहे.

फिलिपिन्समध्ये या स्मार्टफोनची किंमत 15,990 एवढी असून तेथील चलनानुसार 285 युरो एवढी आहे.

नोकिया सी1 हा स्मार्टफोन अँड्रॉईड 9 पाय गो एडिशनुनसार काम करत आहे. या स्मार्टफोनमध्ये 5.45 इंच FWVGA आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनध्ये 5 मेगापिक्सल रियर कॅमेरा असून सेल्फी कॅमेराही 5 मेगा पिक्सेल एवढा आहे. स्मार्टफोनमध्ये 1 जीबी रॅम देण्यात आली आहे.

नोकिया 7.2 स्मार्टफोनमध्ये 6.3 चा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तर 6 जीबी रॅम असणार आहे. या फोनच्या बॅकमध्ये 48 मेगा पिक्सेल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.

स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 20 मेगा पिक्सेल कॅमेरा देण्यात आला असून 3500 mAH बॅटरी बॅकअप आहे.