सोन्याच्या खरेदीसाठी मोदी सरकारनं आणला नवा नियम; 'या' दिवसापासून लागू होणार

By कुणाल गवाणकर | Published: November 14, 2020 03:11 PM2020-11-14T15:11:01+5:302020-11-14T15:14:06+5:30

सोनं खरेदी दरम्यान ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी मोदी सरकार नवे नियम लागू करणार आहे.

मोदी सरकार पुढील वर्षापासून सोन्याच्या हॉलमार्किंगचे नवे नियम लागू करणार आहे. चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात केंद्रानं दागिन्यांसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला.

पूर्ण देशात १ जून २०२१ पासून हॉलमार्किंग अनिवार्य असेल. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक टळेल.

पुढील वर्षापासून देशात ग्राहक संरक्षण कायदा २०१९ देखील लागू होईल. नवा कायदा सोन्यासाठीही लागू असेल.

नवा कायदा लागू झाल्यानंतर फसवणूक करणाऱ्या ज्वेलर्सवर कठोर कारवाई होईल.

२२ कॅरटचं सोनं सांगून १८ कॅरटचं सोनं विकणाऱ्या ज्वेलर्सना नवा कायदा लागू झाल्यानंतर दंड आणि तुरुंगवास होईल.

केंद्र सरकारनं याच वर्षी जानेवारीत नोटिफिकेशनमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणं अनिवार्य असल्याचं नोटिफिकेशन जारी केलं.

१५ जानेवारी २०२१ पासून नवा कायदा लागू होणार होता. मात्र जुलैमध्ये सरकारनं नवा कायदा लागू करण्याची तारीख बदलून १ जून २०२१ केली.

इतक्या कमी अवधीत संपूर्ण देशात हॉलमार्किंगचा नियम लागू करणं अवघड असल्याचं ज्वेलर्स असोसिएशननं म्हटलं होतं.

त्यानंतर ज्वेलर्स असोसिएशननं नियम लागू करण्यासाठीची डेडलाईन पुढे ढकलण्याची मागणी केली. ती सरकारनं मान्य केली.

टॅग्स :सोनंGold