भन्नाटच! ‘या’ कंपनीचा १ रुपयाचा शेअर गेला ७८ वर; १ वर्षांत १ लाखाचे झाले ६६ लाख, पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 06:56 PM2021-12-05T18:56:22+5:302021-12-05T19:03:05+5:30

शेअर मार्केटमधील या मल्टिबॅगर पेनी स्टॉकने एका वर्षात सुमारे ६५०० टक्के वाढ दर्शविली. जाणून घ्या...

गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार होताना पाहायला मिळत आहेत. मात्र, तरीही काही कंपन्या उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. यामुळे गुंतवणूकदारही मालामाल झाले आहेत.

गेल्या दीड वर्षात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला. या कालावधीत अनेक समभागांनी २०२१ मध्ये मल्टिबॅगर स्टॉक टिप्सच्या यादीत स्थान मिळवले आणि यामध्ये काही पेनी स्टॉकचा समावेश आहे.

सूरज इंडस्ट्रिजचा शेअर त्यापैकीच एक आहे. हा मल्टिबॅगर पेनी शेअर १.१८ रुपयांवरून ७८.१५ रुपयांपर्यंत वाढला, ज्याने एका वर्षात सुमारे ६५०० टक्के वाढ दर्शविली.

सूरज इंडस्ट्रिजच्या शेअरच्या किमतीवर नजर टाकली, तर गेल्या वर्षभरापासून हा पेनी शेअर झपाट्याने वाढत आहे. गेल्या एका महिन्यात हा पेनी स्टॉक ३२.८० रुपयांवरून ७८.१५ रुपयांपर्यंत वाढला.

या कालावधीत या मल्टिबॅगरमध्ये जवळपास १४० टक्क्यांची वाढ झाली. गेल्या ६ महिन्यांत या मल्टिबॅगर पेनी स्टॉकची किंमत सुमारे ३४०० टक्क्यांच्या वाढीसह २.२४ रुपयांवरून ७८.१५ रुपयांपर्यंत वाढल्याचे सांगितले जात आहे.

वार्षिक आधारावर विचार केल्यास सूरज इंडस्ट्रिजच्या शेअरची किंमत १.९५ रुपयांवरून ७८.१५ रुपये प्रति शेअर झाली. या कालावधीत सुमारे ३९०० टक्के वाढ झाली. अशा प्रकारे हा मल्टिबॅगर स्टॉक १.१८ रुपये प्रति शेअरच्या पातळीवरून ७८.१५ रुपयांपर्यंत वाढला. म्हणजेच एका वर्षात जवळपास ६६ पटीने वाढला आहे.

सूरज इंडस्ट्रिजच्या शेअरच्या किमतीत झालेली वाढ पाहिली, तर एका महिन्यापूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टिबॅगर पेनी स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे २.४० लाख झाले असते. जर गुंतवणूकदाराने या पेनी स्टॉकमध्ये ६ महिन्यांपूर्वी १ लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे ३५ लाख झाले असते.

एखाद्या गुंतवणूकदाराने २०२१ च्या सुरुवातीला १.९५ रुपयांना सूरज इंडस्ट्रिजचे शेअर्स खरेदी करण्यासाठी १ लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे ४० लाख झाले असते.

तसेच एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या काउंटरमध्ये १.१८ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर हा पेनी स्टॉक विकत घेण्यासाठी १ लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे ६६ लाख रुपये झाले असते, असे सांगितले जात आहे.