5 हजारांच्या गुंतवणुकीवर 65 लाखांचा परतावा, असा आहे LIC चा 'हा' जबरदस्त प्लॅन...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 06:12 PM2022-06-27T18:12:02+5:302022-06-27T18:15:48+5:30

LIC Policy: LICच्या प्लॅन्सद्वारे तुम्ही लाखो रुपयांचा फंड जमा करू शकता. यासाठी एलआयसीने विविध योजना दिल्या आहेत.

LIC Premium: एलआयसीकडून ग्राहकांना विविध योजना पुरवल्या जातात. लोकांना त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या योजना निवडता येतात. LICमध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्याद्वारे आपण मोठ्या प्रमाणात निधी संकलीत करू शकतो. अशीच एक योजना म्हणजे LIC ची नवीन एंडोमेंट प्लॅन योजना.

LIC ची नवीन एंडोमेंट योजना क्रमांक 914 अनेक अर्थांनी खास आहे. या योजनेद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक करता येते आणि चांगला परतावाही मिळू शकतो. यासोबतच एलआयसीच्या या प्लॅनमध्ये लोकांना रिस्क कव्हरही मिळते.

एलआयसी न्यू एंडोमेंट प्लॅनच्या या खास गोष्टी आहेत- या योजनेत पॉलिसीधारकाचे किमान वय 8 वर्षे आणि कमाल वय 55 वर्षे आहे. यात किमान विमा रक्कम (सम अॅश्युअर्ड) 1 लाख रुपये, तर कमाल विमा रक्कमेला कोणतीही मर्यादा नाही. यात 12 वर्षे ते 35 वर्षापर्यंत पैसे ठेवता येतात.

असा मिळवा 65 लाखाचा निधी- तुमचे वय 30 वर्षे असल्यास, एलआयसीच्या या नवीन एंडोमेंट प्लॅनद्वारे तुम्ही 65 लाख रुपयांचा निधी तयार करू शकता. जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी ही योजना घेत असाल तर विम्याची रक्कम 19 लाख रुपये ठेवावी लागेल.

या वयात योजनेची मुदत 30 वर्षे ठेवावी लागेल. त्यानंतर पहिल्या वर्षासाठी प्रत्येक महिन्याला सुमारे 5253 रुपये प्रीमियम म्हणून जमा करावे लागतील. यानंतर दुसऱ्या वर्षापासून मॅच्युरिटीपर्यंत प्रत्येक महिन्याला 5140 रुपये प्रीमियम असेल.

यानंतर, मॅच्युरिटीची रक्कम 30 वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या 60 व्या वर्षी उपलब्ध होईल. तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम म्हणून सुमारे 65,55,000 रुपयांचा परतावा मिळेल. ही रक्कम खूप मोठी आहे.