'ही' बँक देतेय सर्वात स्वस्त Home Loan; व्याजदर ६.६५ टक्क्यांपासून, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 10:57 AM2021-04-13T10:57:55+5:302021-04-13T11:01:07+5:30

Cheapest Home Loan Offer: जर तुम्ही घर घ्यायच्या विचारात असाल आणि स्वस्त Home Loan हवं असेल तर हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

जर तुम्ही घर घेण्याच्या विचारात असाल आणि स्वस्त होमलोनच्या शोधात असाल तर कोटक महिंद्रा बँकेच्या विशेष ऑफरचा फायदा तुम्ही घेऊ शकता.

कोटक महिद्रा बँकेने कन्सेशनल होमलोन पुढेही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोटक महिंद्रा बँक या खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकेनं यापूर्वी १ मार्च ते ३१ मार्च दरम्यान होमलोनच्या व्याजदरात १० बेसिस पॉईंट्सची (bps) कपात करण्याची घोषणा केली होती.

या कपातीनंतर होम लोनचे व्याजदर कमी होऊन ६.६५ टक्क्यांवर आले होते. दरम्यान, बँकेनं ही ऑफर ३१ मार्चनंतरही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

होम लोनची ही ऑफर बाजारातील अन्य बँकाच्या तुलनेत सर्वात स्वस्त ऑफर असल्याचा दावा बँकेनं केला आहे.

कोटक बँकेची ही ऑफर सर्व लोन खात्यांना लागू आहे. हे होमलोनचे व्याजदर ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअर आणि लोन टू व्हॅल्यूच्या प्रमाणात जोडले जातील.

हे दर होमलोन आणि बॅलन्स ट्रान्सफर लोनवर लागू होणार आहेत. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीही या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात स्वस्त ऑफरपैकी ही एक आहे. होमलोन घेण्यासाठी Kotak Digi Home Loans द्वारे अर्ज करता येऊ शकतो. तसंच यासाठी प्रोसेसिंग टाईमही कमी लागतो.

"अलिकडच्या काही महिन्यांत घरांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आम्हाला आशा आहे की ही वाढ पुढेही कायम राहील, कारण लोकं त्यांच्या घरात राहण्यासाठी आणि घरातूनच काम करण्यास उत्सुक आहेत," असं कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष (ग्राहक मालमत्ता) अंबुज चांदना म्हणाले.

अशा परिस्थितीत आम्ही घर खरेदी करणाऱ्यांना स्वस्त कर्जे देण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे होम लोनचे व्याजदर ६.६५ टक्क्यांनी सुरू होतात, असंही त्यांनी सांगितलं.

आम्ही दर्जेदार होमलोन बुक तयाक करण्याची एक संधी म्हणूनही याकडे पाहतो, असंही त्यांनी नमूद केलं.

३१ डिसेंबरपर्यंत कोटक महिंद्रा बँकेचे होमलोन अगेन्स्ट पॉपर्टी बुक (LAP) ४९,९७७ कोटी रूपये इतके होते.

यापूर्वी बँकेनं ही ऑफर ३१ मार्च पर्यंत देण्याची घोषणा केली होती. तसंच ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं.

दरम्यान, इतर बँकांच्या तुलनेत कोटक महिंद्रा बँकेचे होमलोनचे व्याजदर कमी असल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला होता.

मार्च महिन्यात अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना होमलोनच्या व्याजदरात कपात करून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता.