बापरे! 'या' लहान Tea Stall वर एक कप चहासाठी लोक मोजतात तब्बल 1000 रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 02:42 PM2021-03-01T14:42:50+5:302021-03-01T15:17:46+5:30

This Kolkata tea stall serves special chai for Rs 1,000 per cup : हुडहुडी भरवणारी थंडी... हातामध्ये कप आणि त्यामध्ये गरम वाफळणारा चहा... जीवन अगदी सार्थकी लागल्यासारखेच वाटते.

नवी दिल्ली : थंडीमध्ये चहा पिण्याची मजा काही औरच... पण अनेकांचा चहा हा जीव असतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्नतेने करण्यासाठी चहा फार उपयोगी असतो.

हुडहुडी भरवणारी थंडी... हातामध्ये कप आणि त्यामध्ये गरम वाफळणारा चहा... जीवन अगदी सार्थकी लागल्यासारखेच वाटते. देशाच्या कानाकोपऱ्यातही वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळतात.

तसेच, सध्याच्या बदलणाऱ्या काळानुसार, प्रत्येक गोष्टीप्रमाणेच चहामध्येही वेगवेगळे एक्सपरिमेंट्स होत असलेले दिसतात. मसाला चहा, वेगवेगळ्या फ्लेवर्सचा चहा एवढचं नव्हे तर इतर देशांमधील ट्रेन्ड इथे फॉलो होताना दिसतात.

असाच कपभर चहा पिण्याची मजा घेण्यासाठी एका छोट्या चहाच्या स्टॉलवर तुम्ही एक कप चहासाठी 10-12 रुपये द्याल किंवा जास्तीत जास्त 15 रुपये. परंतु कोलकात्यात एका लहान स्टॉलमध्ये एक कप चहासाठी लोकांना 1000 रुपये मोजावे लागतात.

हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल असलेच. कोलकाता येथे राहणाऱ्या पार्थ प्रतिम गांगुलीने (Partha Pratim Ganguly) 2014 मध्ये मुकुंदपूर येथे आपला चहा स्टॉल निर्जश (Nirjash) लॉन्च केला.

या स्टॉलमध्ये एका कपमधून 12 रुपयांपासून ते एक हजार रुपयांच्या विविध प्रकराचा चहा विकला जातो. विशेष म्हणजे, निर्जश पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक अतिशय लोकप्रिय चहाचा स्टॉल आहे. (Famous Tea Stall in Kolkata, WB)

1000 रुपये प्रति कपमधील हा चहा अगदी अनोखा आहे. या छोट्या चहाच्या स्टॉलवर 100 हून अधिक प्रकारचा अनोखा चहा तयार करण्यात येतो.

सोशल मीडिया रिपोर्ट्सनुसार, याठिकाणी एक कप चहाची किंमत 12 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत आहे. जी प्रत्यक्षात Bo-Lay Tea आहे आणि त्याची किंमत प्रति किलो तीन लाख रुपये आहे.

येथील चहाच्या इतर प्रकारांमध्ये सिल्व्हर नीडल, व्हाइट टी, लॅव्हेंडर टी, हिबिस्कस टी, वाईन टी, तुळस-जिंजर टी, ब्लू टिश्यन टी, तिस्ता व्हॅली टी, मकईबारी टी, रुबियोस टी आणि ओक्टी टी यांचा समावेश आहे.

दरम्यान, सात वर्षांपूर्वी पार्थ प्रतिमा गांगुली एका कंपनीत काम करत होते. त्यावेळी त्यांनी चहाचा व्यवसाय करण्याचा विचार केला होता. त्यानुसार, पार्थ प्रतिमा गांगुली यांनी आपली नोकरी सोडून स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.