वयाच्या १२ व्या वर्षी अमेरिका सोडून भारतात यावं लागलं; आज बनले YouTube चे सर्वात मोठे बॉस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:11 IST
1 / 10सध्या युट्यूब जगातील सर्वात ताकदवान लाईव्ह स्ट्रिमिंग मानले जाते. याचे प्रमुख श्रेय जाते नील मोहन यांना..अलीकडेच टाइम मॅग्जिनने सीईओ ऑफ द ईयर २०२५ साठी नील मोहन यांची निवड केली आहे. आज युट्यूबचे सीईओ नील मोहन यांच्या यशाबद्दल जाणून घेऊ. २०२३ मध्ये जेव्हा सुसान वोज्सिकी हे पायउतार झाले तेव्हा नील मोहन यांनी ही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली. नील मोहन इतके शांत आणि विचारशील आहेत की त्यांच्या हजेरीमुळे शांत वातावरण निर्माण होते असं टाइम मॅग्जिनने म्हटलं.2 / 10२०२५ मध्ये युट्यूबने टीव्ही स्क्रिन्सवर कब्जा केला आहे. युट्यूब टीव्ही लोकांना केबलसाठी पर्याय म्हणून पुढे आला आहे. युट्यूब शॉर्ट्स २ अब्ज युजर्स आहेत. २ अब्ज डेली विजिटर्स, प्रत्येक मिनिटाला ५०० तासांचा नवा कन्टेट अपलोड होत आहे. नील मोहन यांनी पूर्ण फोकस युट्यूब चालवण्यावर ठेवला आहे.3 / 10अमेरिकेच्या मिशिगन शहरात सामान्य कुटुंबात जन्मलेले नील मोहन यांचे वडील १९६० च्या दशकात फक्त २५ डॉलर घेऊन सिविल इंजिनिअरींमध्ये पीएचडी करण्यासाठी अमेरिकेत पोहचले होते. घरातून सुरू झालेला हा संघर्ष मोठ्या हिंमतीने भरला होता. 4 / 10वयाच्या ६ व्या वर्षी नील यांनी आई वडिलांकडे स्टार वार्स हा सिनेमा दाखवण्यासाठी हट्ट धरला. पहिल्या रात्री तिकीट मिळाली नाही म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी थिएटर गाठले. हा एक सिनेमा नव्हता तर त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पाँईट होतो. ज्यात त्यांना टेक्नोलॉजिकल आणि मिडिया याबाबत अधिक रस घेण्याची इच्छा झाली. 5 / 10मात्र नील यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा एक मोठा बदल झाला. जेव्हा ते १२ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या कुटुंबाला भारतातील लखनऊ शहरात शिफ्ट व्हावे लागले. त्यांच्यासाठी हा मोठा सांस्कृतिक धक्का होता. अमेरिकन मित्रांना गमावणे, नवीन भाषा शिकणे, नवी संस्कृती, त्यांना हिंदी भाषा शिकावी लागली. इतकेच नाही तर संस्कृतही शिकावे लागले. 6 / 10कॉलेजचं शिक्षण झाल्यानंतर ते अमेरिकेत परतले. तिथे त्यांनी बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले. एका कन्स्लटिंग फर्ममध्ये काम सुरू केले. त्यानंतर छोटा स्टार्टअप सुरू केला. जे त्या काळात इंटरनेटवर पैसे कमावण्याची संधी शोधत होते. त्या कंपनीचे नाव NetGravity..ही कंपनी इंटरनेटवर जाहिराती टाकण्याचे मार्ग शोधत होती. इथूनच त्यांचा डिजिटल जगातील प्रवास सुरू झाला.7 / 10हा सुरुवाती काळ होता, जेव्हा इंटरनेट खूप नवीन होते आणि त्यातून कसे पैसे कमवावे हे कोणालाही माहिती नव्हते. लवकरच नेटग्रॅव्हिटीला डबलक्लिक या एका प्रमुख जाहिरात-तंत्रज्ञान कंपनीने विकत घेतले. नीलने डबलक्लिकमध्ये काम करण्यास सुरुवात केली, जाहिरात उत्पादने विकसित केली. हा त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा होता. २००७ मध्ये गुगलने डबलक्लिकला $३.१ अब्जमध्ये विकत घेण्याचा निर्णय घेतला. डबलक्लिकच्या वतीने नील मोहन हा व्यवहार करत होते.8 / 10हा करार गुगलसाठी गेम चेंजर ठरला. सर्च इंजिनला मोठ्या शक्तीत बदलले. युजरच्या आवडीनुसार जाहिराती तयार करणारं असं तंत्रज्ञान तयार करण्यात नीलने महत्त्वाची भूमिका बजावली. जर तुम्ही बाईक व्हिडिओ पाहिला आणि नंतर सर्वत्र बाईक विम्याच्या जाहिराती दिसू लागल्या तर नील मोहन याला अंशतः जबाबदार आहे. या करारामुळे गुगलमध्ये ते शक्तिशाली व्यक्ती बनले. 9 / 10गुगलमध्ये असताना नीलची भेट सुसान वोज्सिकी यांच्याशी झाली, जी त्यावेळी गुगलचा जाहिरात व्यवसाय सांभाळत होती. सुसानने गुगलसाठी डबलक्लिक खरेदी करण्यावर जोर दिला होता. ती नीलची मार्गदर्शक आणि जवळची मैत्रीण बनली. जेव्हा सुसानने युट्यूबचा ताबा घेतला तेव्हा ती नीलला सोबत घेऊन गेली. नील मोहनला युट्यूबमध्ये चीफ प्रोडक्ट ऑफिसर (सीपीओ) ची जबाबदारी मिळाली. 10 / 10युट्यूबमध्ये काम करणे त्यांच्यासाठी एक नोकरी नव्हती तर छंद होता. ते स्वत:ला एक टेक्नोलॉजिस्ट मानतात, त्यांनी YouTube ला फक्त व्हिडिओ पाहण्याच्या जागेपासून ते घरातील सर्वात मोठ्या स्क्रीनवर - टेलिव्हिजनमध्ये रूपांतरित करण्याचे काम सुरू केले. २०१७ मध्ये त्यांनी अॅप डिझाइन करण्यास सुरुवात केली जेणेकरून लोक ते टीव्हीवर आरामात पाहू शकतील. जेव्हा कोविड-१९ महामारी आली आणि लोक त्यांच्या घरातच बंदिस्त होते तेव्हा YouTube पूर्णपणे तयार होते. आज YouTube च्या एकूण दर्शकांपैकी जवळजवळ निम्मे दर्शक टीव्ही स्क्रीनवरून येतात. हे नील मोहनच्या दूरदृष्टीचे परिणाम होते.