भन्नाट प्लान! केवळ १ रुपयांत महिनाभर मिळवा २४ जीबी जादा डेटा; फ्री कॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 03:29 PM2021-05-18T15:29:42+5:302021-05-18T15:40:24+5:30

नेमकी कोणती कंपनी हा प्लान ऑफर करत आहे आणि प्लानची वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या... (vi prepaid plans)

टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा दिवसेंदिवस चुरस होत चालली असून, कमी पैशांत अधिक सुविधा असणारे डेटा पॅक कंपन्यांकडून सादर केले जात आहेत.

जिओच्या टेलिकॉम कंपनीतील प्रवेशानंतर व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांनी एकत्रितपणे Vi ची स्थापना केली. यानंतर आता स्पर्धेत टिकण्यासाठी अनेकविध प्लान आणले जात आहेत.

Vi आपल्या युजर्संसाठी अनेक प्रकारचे प्रीपेड प्लान ऑफर करीत आहेत. ग्राहाकांना आपल्या पसंतीनुसार, बेस्ट प्लानची निवड करता यावी, यासाठी कंपनी विविध प्लान सादर करत आहे.

Vi चे खूप प्लान्स उपलब्ध आहेत. अनेक प्लान तर असे आहेत त्यात फक्त १ रुपयांचा फरक आहे. परंतु, सुविधा वेगवेगळ्या आहेत.

Vi च्या अशाच एका प्लान संबंधी जाणून घ्या ज्यात १ रुपया जास्त देऊन २४ जीबी डेटा जास्त मिळतो. २१८ रुपये आणि २१९ रुपयाचे हे दोन प्लान आहेत.

Vi चे २१८ रुपये आणि २१९ रुपयाचे दोन प्लान असून, दोन्ही प्लान जवळपास सारखेच आहेत. प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता आणि फ्री कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये फक्त डेटाचा फरक आहे.

Vi च्या २१८ रुपयांच्या प्लानमध्ये फक्त ६ जीबी डेटा मिळतो. तर २१९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच १ रुपया अतिरिक्त देऊन तुम्ही २४ जीबी एक्स्ट्रा डेटा मिळवू शकता.

Vi च्या २१८ रुपयांच्या प्लानमध्ये मर्यादीत डेटा दिला जातो. या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळत असून यात एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. तसेच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. याशिवाय, ग्राहकांना Vi Movies & TV Basic चे अॅक्सेस दिले जाते.

Vi च्या २१९ रुपयांचा प्लान सुद्धा २१८ रुपयाप्रमाणे आहे. यात २८ दिवसांची वैधता मिळते. यात ग्राहकांना रोज १ जीबी डेटा आणि २ जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो.

यात एकूण ३० जीबी डेटा होतो. प्लानमध्ये सर्व अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. याशिवाय, ग्राहकांना Vi Movies & TV Basic चे अॅक्सेस मिळते.