मस्तच! आता कागदपत्रांशिवाय केवळ एका फोनवर मागवा LPG गॅस सिलिंडर; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 06:55 PM2021-04-25T18:55:27+5:302021-04-25T19:00:10+5:30

आता मात्र LPG गॅस सिलिंडर मिळण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. (5 kg LPG gas cylinder on one call without documents)

गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे इंधनदरवाढ होताना पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीही वाढताना पाहायला मिळत आहे.

सातत्याने होणाऱ्या इंधनदरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे नियोजन आणि गणित दोन्ही बिघडल्याचे दिसत आहे. गॅस हा प्रत्येकाची गरज बनलेला आहे. गॅस सिलिंडर खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

गॅस एजन्सीला आयडी प्रूफ आणि बरेच कागदपत्र द्यावी लागतात. त्यानंतरच आपल्याला गॅस सिलिंडर देण्यात येतो. आता मात्र LPG गॅस सिलिंडर मिळण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. (LPG gas cylinder)

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने ग्राहकांसाठी नवीन सुविधा आणली केली आहे. आता केवळ एका कॉलवर ५ किलो LPG सिलिंडर सहज घरी मिळू शकेल. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत. हे विशेष.

आपल्या शहरातील कोणत्याही इंडियन गॅस वितरकाकडून सहजपणे ५ किलो LPG सिलिंडर खरेदी करता येऊ शकतो. गॅस एजन्सीवर जाऊनही ५ किलोचा LPG सिलिंडर लगेचच घेऊन येऊ शकतो.

इंडियन ऑइल कंपनीने 1800-22-4344 हा टोल फ्री क्रमांक ५ किलोचे LPG सिलिंडर ऑर्डर करण्यासाठी जाहीर केला आहे. या क्रमांकावर संपर्क करून ५ किलो LPG सिलिंडर मागवता येऊ शकतो.

मात्र, यासाठी नाममात्र वितरण शुल्क २५ रुपये द्यावे लागेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा देणे आवश्यक असेल, असे सांगितले जात आहे.

LPG सिलिंडर बुकिंग केल्यानंतर अवघ्या २ तासांत घरी येईल. विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही प्रकारचा ऍड्रेस प्रूफ देण्याची आवश्यता लागणार नाही. दिल्लीत या सिलिंडरची किंमत अनुदानाशिवाय ३४० रुपये आहे.

LPG गॅस सिलिंडर ग्राहक पुन्हा रिफिल करू शकतात. आपण इंडियन गॅसच्या कोणत्याही विक्री केंद्रावर जाऊ शकता. (5 kg LPG gas cylinder on one call without documents)

रिटर्न खरेदीच्या तारखेपासून ५ वर्षांच्या आत असेल तर गॅस आणि कराचा खर्च वगळता सिलिंडरची खरेदी किंमत आणि प्रेशर रेग्युलेटरचे ५० टक्के पैसे परत केले जाणार आहेत.