'जिओ' मेरे लाला, अंबानीपुत्राचा शाही लग्नसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 07:05 PM2019-03-09T19:05:01+5:302019-03-09T19:45:30+5:30

अंबानीपुत्र आकाश आणि श्लोका यांच्या विवाहात सेलिब्रिटींनी गर्दी केली आहे. या विवाह सोहळ्यातील थाटमाट डोळे दिपणारा आहे. तर अंबानींच्या अँटिलिया बंगल्यालाही नववधुप्रमाणे सजविण्यात आलं आहे.

आकाश यांच्या लग्नाची वरात जिओ वर्ल्ड सेंटर येथे पोहोचेल, त्यानंतर येथेच हा लक्षणीय विवाहसोहळा संपन्न होत आहे. लग्नसोहळ्यातील संगीत अन् सजावटीची वेगळीच चर्चा रंगली आहे.

या शानदार लग्नसोहळ्यासाठी अभिनेता आमीर खान, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, यांसह संयुक्त राष्ट्राचे माजी सचिव 'बान की मून' यांनीही उपस्थिती लावली आहे.

आकाशच्या लग्नाची वरात जिओ सेंटरमध्ये पोहोचल्यानंतर गाणं अन् संगीताची धूम पाहायला मिळाली. आकाश यांची वरातही धुमधडाक्यात निघाली होती.

जिओ सेंटरमध्ये पोहोचल्यानंतर आकाश अंबानी यांनी आजोबा धीरूभाई अंबानींच्या फोटोचे दर्शन घेतले.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मुलाच लग्न म्हटल्यावर चर्चा तर होणारच अन् होऊ दे खर्च हे सांगायला नकोच, हा फोटो पाहूनच समजेल तु्म्हाला

फुलांची आरास अन् सजावटींची नयनरम्य दृश्ये पाहून तुम्हीही म्हणाल... निदान लग्न पाहायची तरी संधी आपल्याला भेटायला हवी होती

नाच रे मोरा अंबानीच्या दारात.... अंबानीपुत्राचं लग्न म्हटल्यावर नथिंग इज इम्पॉसिबल. पाहा फुलांनी सजलेला मोर

लग्न म्हटलं की डान्स अन् उत्साह आलाच, नवरदेव आकाश अंबानी अन् नटलेली नवरी श्लोका

आकाश अंबानींच्या लग्नसोहळ्याला लंडन आणि चीनमधील प्रतिष्ठित मोठे राजकारणी हजर झाले आहेत.

वरमाय अन् वरबापाच्या चेहऱ्यावरील 'आनंद' आकाशच्या लग्नात अंबानी जोडीवर खुलून दिसत आहे

अंबानी कुटुंबीयांचा लग्नातील फॅमिली फोटो, हा फोटो पाहून एवढंच म्हणता येईल... आनंद पोटात यांच्या माईना