Jio Down : फेसबुकनंतर जिओ गंडले, पुन्हा नेटीझन्सचे मिम्स रंगले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 03:49 PM2021-10-06T15:49:54+5:302021-10-06T16:33:52+5:30

ट्विटरवर #jiodown ट्रेंड करत होता. अनेकांनी नेटवर्क डाऊन झाल्यामुळे सोशल मीडियावरून संतापही व्यक्त केला. तर, काहींनी मिम्स बनवत डाऊनचा आनंदही लुटला

सोमवारी रात्री काही तासांसाठी फेसबुकच्या सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या. फेसबुक आणि इन्स्टाग्राम सहा तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी बंद राहिले.

भारतीय वेळेनुसार ते ३ वाजून २४ मिनिटांनी पुन्हा सुरू करण्यात आलं. तर दुसरीकडे Whatsapp तब्बल ७ तासांनंतर म्हणजेच भारतीय वेळेनुसार सकाळी ४ वाजून १९ मिनिटांनी सुरू झालं.

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या तिन्हीवर फेसबुकचं स्वामित्व आहे. यामुळे या तिन्हीचे सर्व्हर एकमेकांशी जोडलेले आहे. फेबसुक बंद झाल्याने मार्क झुकरबर्गला ट्रोल करण्यात आलं होतं.

सोशल मीडियावर ट्विटरचा आणि फेसबुकचा टॅग ट्रेंड करत होता, विशेष म्हणजे फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्असचे अनेक मिम्सही व्हायरल झाले होते.

आज बुधवारी सकाळी काही वेळासाठी रिलायन्स जिओचं नेटवर्कही डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानंतर ट्विटरवर #jiodown ट्रेंड करत होता. अनेकांनी नेटवर्क डाऊन झाल्यामुळे सोशल मीडियावरून संतापही व्यक्त केला. तर, काहींनी मिम्स बनवत डाऊनचा आनंदही लुटला

रिलायन्स जिओचे नेटवर्क संपूर्ण देशात बाधित झालं नसलं तरी ट्विटरवरील माहितीनुसार मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि आणखी काही शहरांमध्ये ग्राहकांना समस्या जाणवत होत्या.

एक ते दीड तासांसाठी रिलायन्स जिओच्या ग्राहकांना समस्या जाणवत होत्या. जुलै महिन्यात रिलासन्स जिओच्या अॅक्टिव्ह ग्राहकांची संख्या ६१ लाखांनी वाढली.

दरम्यान, भारती एअरटेलच्या (Bharti Airtel) च्या युझर्सच्या संख्येत २३ लाखांची वाढ झाल्याची माहिती भारतीय दूरसंचार नियामक ट्रायच्या आकडेवारीवरून समोर आलं.

जुलैच्या अखेरिस जिओच्या मोबाईल युझर्सची संख्या ३४.६४ कोटी इतकी होती. विशेष म्हणजे यावरुनही मिम्स बनविण्यात आले आहेत. अजय देवगणचा रुबाबात असलेला फोटो व्हायरल होत आहे.

पोलिसांना आता एवढचं काम राहिलं आहे की, त्यांनी कंपन्यांच्या नेटवर्कचा तपास करावा

रिलायन्स जिओचे नेटवर्क गायब झाल्यानंतर युजर्सने असा आराम केला

जिओ नेटवर्क गंडल्यानंतर एअरटेलसह इतर कंपन्यांचा रुबाब असाच राहिला असेल ना