जाणून घ्या, गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरणारी अशी ही 'SIP' योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 08:02 AM2019-06-25T08:02:48+5:302019-06-25T08:05:28+5:30

महागाईच्या काळात कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणं कठीण होऊन जातं. अनेकदा आपण पैसे साठवून ठेवण्याचा विचार करतो पण पैसे खर्च होतात. कितीही प्रयत्न केले पैसे वाचविण्याचा तरीही हातात शिल्लक राहत नाही. अशा लोकांसाठी खास प्लॅन आहे ज्यात तुम्ही दिवसाला 10 रुपये गुंतवणूक करुन 1 करोडपेक्षा अधिक कमवू शकता.

एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टेमेंट प्लॅन) मागील काही महिन्यांपासून अनेक गुंतवणूकदारांची पसंती या प्लॅनसाठी आहे. कारण गुंतवणूक करुन मोठ्या प्रमाणात परतावा मिळतो.

गेल्या काही वर्षांपासून एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टेमेंट प्लॅन)मध्ये लोकांना 18 टक्के रिटर्न मिळत आहेत. जर तुम्ही 35 वर्षांसाठी दिवसाला 10 रुपये गुंतवले तर त्याचे 18 टक्के रिटर्न मिळतील. म्हणजे 35 वर्षानंतर तुम्हाला 1 करोड पर्यंत परतावा मिळू शकेल..

एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टेमेंट प्लॅन) च्या माध्यमातून तुमच्या गरजा पूर्ण करणं आता सोपं झालं आहे. एसआयपीत गुंतवणूक केलेल्यांना पुरेसा नफा मिळाला असला तरी आगामी काळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे

शेअर बाजारातील चढउताराचा विचार करता दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपीवर भर देण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. ‘एसआयपी’मुळे दरवर्षी तुम्हाला नियमित स्वरुपात गुंतवणुकीची संधी मिळते.