Income Tax: सब झूट! नवीन कर प्रणालीत तीन डिडक्शनचा लाभ घेता येणार; कोणते ते पहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 06:32 PM2023-02-04T18:32:35+5:302023-02-04T18:45:20+5:30

सरकारी कर्मचाऱ्यांना ४ टक्के अधिकचा फायदा मिळणार...

देशाचा अर्थसंकल्प तीन दिवसांपूर्वीच मांडण्यात आला. यातील एकच लोकप्रिय ती देखील टीका झालेली घोषणा म्हणजे नवीन कर प्रणाली आणि त्यात काहीच होत नसलेले डिडक्शन. यामुळे जुन्या प्रणालीत ज्यांनी कर वाचविण्यासाठी पैसे गुंतविलेत त्यांना लाभ घेता येणार नाही. अर्थमंत्र्यांनुसार ५० टक्के लोक नवीन कर प्रणाली स्वीकारतील. मग जुन्या प्रणालीतील पैसे गुंतविलेल्याचे काय? असा प्रश्न उभा राहिला होता.

परंतू नवीन कर प्रणालीत देखील तीन प्रकारच्या डिडक्शनचा लाभ घेता येणार आहे. नवीन कर प्रणालीत कराचे दर हे जुन्यापेक्षा खूप कमी आहेत. म्हणजे लोकांचे यात पैसे वाचत आहेत. परंतू, जे लोक पैसे वाचविण्यासाठी किंवा शून्य कर करण्यासाठी त्यांचा इन्कम दुसऱ्या योजनेत गुंतवत होते. या पैशांचे काय करणार असा प्रश्न लोकांना पडला आहे. तिथे पैसे गुंतवावेच लागणार आहेत, तरीही कर भरावा लागणार आहे, असे लोकांचा समज झालेला आहे.

हा समज काही खोटा नाहीय. कारण ८० सी मध्ये जे फायदे लोकांना मिळते होते, ते आता मिळणार नाहीएत. परंतू नवीन कर प्रणालीमध्ये तुम्ही तीन प्रकारे कर वाचविण्याचे फायदे मिळवू शकणार आहात. नवीन कर प्रणालीमध्ये इतर काही फायदे आहेत ज्या अंतर्गत फायदे उपलब्ध आहेत. हे फायदे कोणते आहेत?

ही वजावट फक्त त्या करदात्यांनाच मिळते ज्यांचे पगारातून उत्पन्न आहे. म्हणजेच नोकरदार आहेत. म्हणजेच नोकरी व्यावसायिक, पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांना याचा लाभ मिळू शकतो. पगार किंवा पेन्शनचे उत्पन्न असलेले लोक 50,000 रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा दावा करू शकतात.

महत्वाचे म्हणजे कंपनीला कोणतीही कागदपत्रे न देता याचा लाभ घेता येतो. पगारावर कराची मोजणी करत असताना कंपनी आपोआपच ही वजावट धरते. कौटुंबिक पेन्शनधारकांच्या बाबतीत, नवीन कर प्रणाली अंतर्गत 15,000 रुपयांची स्टँडर्ड वजावट उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. आतापर्यंत हा लाभ जुन्या आयकर प्रणालीमध्ये उपलब्ध होता.

तुमची कंपनी जर तुमच्या एनपीएसमध्ये योगदान देत असेल तर त्यावर तुम्ही वजावट मागू शकता. ही वजावट देखील नोकरदारांनाच मिळते. आयकर कायद्याच्या कलम 80CCD (2) अंतर्गत या वजावटीचा दावा केला जाऊ शकतो. या कलमांतर्गत कर्मचारी दावा करू शकणारी कमाल रक्कम खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेगळी आहे.

खाजगी क्षेत्रातील कर्मचारी त्यांच्या पगाराच्या 10 टक्क्यांपर्यंत कमाल कपातीचा दावा करू शकतात. त्याच वेळी, सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत, पगाराच्या 14% पर्यंत कमाल कपात करण्याची परवानगी आहे.

अग्निवीर कॉर्पस फंडमध्ये जमा केलेल्या रकमेवर कलम 80CCH अंतर्गत आयकर सूट मिळेल. आयकर कायद्याचे हे नवीन कलम आहे. जमा केलेल्या रकमेवर वजावट म्हणून दावा केला जाऊ शकतो. अग्निवीर कॉर्पस फंडातून मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कमही करमुक्त असेल.