तुम्ही ATM मधून पैसे काढत असाल तर सावध राहा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 03:18 PM2021-10-14T15:18:27+5:302021-10-14T15:28:16+5:30

ATM : एटीएम फसवणूक करण्यासाठी गुन्हेगार विविध पद्धती अवलंबतात, ज्या सामान्य लोकांना माहीत नसतात.

नवी दिल्ली : एक काळ होता जेव्हा लोकांना पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये रांगा लाव्या लागायच्या आणि रांगा इतक्या मोठ्या होत्या की तुमचा नंबर येईपर्यंत सकाळपासून संध्याकाळ व्हायचा. परंतु आजच्या काळात एटीएमने बँकांमधून पैसे काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे.

तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलात, एटीएम असल्यास तुम्ही गरजेनुसार सहज पैसे काढू शकता. मात्र, गेल्या काही वर्षांत एटीएम फसवणुकीच्या घटनाही दिसून आल्या आहेत. ज्यामध्ये अनेक लोकांचे अकाउंट रिकामी झाली आहेत.

एटीएम फसवणूक करण्यासाठी गुन्हेगार विविध पद्धती अवलंबतात, ज्या सामान्य लोकांना माहीत नसतात. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. जर तुम्ही एटीएममध्ये पैसे काढायला गेला असाल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आधी कॅमेरा बसवला आहे की नाही हे तपासा.

या व्यतिरिक्त, हे देखील तपासा की कार्ड घातले जाणाऱ्या ठिकाणी संशयास्पद काहीही नाही. काही संशयास्पद दिसल्यास काळजी घ्या. दरम्यान, फसवणूक करणारे कार्ड रीड करणाऱ्या ठिकाणी चिप लावतात, जेणेकरून त्यांना तुमच्या कार्डवरील सर्व माहितीची चोरी करता येईल.

याचबरोबर, असे बरेच लोक आहेत, जे त्यांचे एटीएम कार्ड पिन आणि कार्ड इत्यादी त्यांच्या मित्र किंवा नातेवाईकांसोबत शेअर करतात, तर हे अजिबात केले जाऊ नये, कारण अशा घटना पाहिल्या गेल्या आहेत, जेव्हा त्यांची स्वतःची फसवणूक आणि तुमचे एटीएममधून पैसे काढणे तुमचे अकाउंट रिकामे करतात.

जर तुम्ही एटीएममधून पैसे काढणार असाल पिन टाकताना हाताने कव्हर करणे फार महत्वाचे आहे, जेणेकरून दुसरा कोणीही तुमचा पिन पाहू शकणार नाही. कधीकधी फसवणूक करणारे लपवलेल्या कॅमेऱ्याद्वारे तुमचा पिन चोरतात. यामुळे तुमची लाखोंची फसवणूक होऊ शकते.

एटीएममधून पैसे काढल्यानंतर तुम्ही कॅन्सल बटण आवश्य दाबले पाहिजे. यामुळे तुमची माहिती इतर कुठेही लीक होणार नाही. जर तुम्ही पैसे काढले असतील, तर स्क्रीनवर वेलकम लिहिलेले न येईपर्यंत स्क्रीनच्या जवळून हलू नका.

Read in English