कसा चेक कराल EPF बॅलन्स?, विना UAN कशी काढायची रक्कम; जाणून घ्या माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 01:17 PM2021-10-22T13:17:51+5:302021-10-22T13:23:59+5:30

तुमच्याकडे जरी UAN क्रमांक नसला तरी तुम्ही तुमच्या PF खात्यातून रक्कम काढू शकता.

तुमच्याकडे UAN नसला तरी तुम्ही तुमच्या PF खात्यातून रक्कम काढू शकता. यासाठी तुम्हाला ईपीएफओ कार्यालयाला भेट देऊन एक फॉर्म भरावा लागेल. तथापि, अशा प्रकारे पीएफ काढण्यासाठी तुम्हाला ईपीएफओ कार्यालयाच्या फेऱ्या कराव्या लागतील.

जर तुम्हाला हे टाळायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. त्याच वेळी, ईपीएफ मधील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी ईपीएफओ खातेधारकाला फक्त एक मिस्ड कॉल द्यावा लागेल.

अर्ज करण्यासाठी तुम्हाला EPFO च्या https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या बेवसाईटला भेट द्यावी लागेल. या ठिकाणी तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा. त्यानंतर मॅनेजवर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्या KYC ची सर्व माहिती पडताळून पाहा. यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Online Services वर क्लिक करा. त्यानंतर एक ड्रॉप मेन्यू ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला Claim हा ऑप्शन दिसेल. तो क्लेम फॉर्म सबमिट करून Proceed For Online Claim वर क्लिक करा.

जर तुम्हाला यातून अॅडव्हान्स रक्कम काढायची असेल तर ‘I Want To Apply For’ या ऑप्शनमध्ये जा. यामध्ये full EPF Settlement, EPF Part withdrawal (loan/advance) किंवा pension withdrawal चा ऑप्शन निवडा. तो भरल्यानंतर ५ ते १० वर्किंग डेजमध्ये तुमच्या रजिस्टर्ड खात्यात तुमचे पैसे ट्रान्सफर होतील.

याची माहिती तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे मिळून जाईल. तसंच तुमचं ईपीएफ खातं Aadhaar Card शी लिंक असेल तर ऑनलाईन पैसे काढण्यासाठीही तुम्ही अर्ज करू शकता.

तुमच्या पीएफमधील शिल्लक रक्कम जाणून घेणं खूप सोपं आहे. यासाठी कोणताही एसएमएस पाठवण्याची किंवा ऑनलाईन शोधण्याची गरज नाही. फक्त एक मिस्ड कॉल करा आणि काही सेकंदात तुमचा मोबाईल स्क्रीनवर तुमचा पीएफ शिल्लक मिळवता येऊ शकतो.

तुम्हाला फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करायचा आहे. यानंतर, पीएफचा तपशील ईपीएफओच्या संदेशाद्वारे प्राप्त होईल. यासाठी तुमचे यूएएन, पॅन आणि आधार येथे जोडलेले असणे आवश्यक आहे.

जर तुमचा UAN क्रमांक EPFO ​​मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुमच्या PF च्या शिल्लक रकमेची माहिती संदेशाद्वारे तुम्हाला प्राप्त होईल. यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG (भाषेसाठी शेवटची तीन अक्षरे) 7738299899 वर मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती मेसेजद्वारे मिळेल.

जर तुम्हाला हिंदी भाषेत माहिती हवी असेल तर तुम्हाला EPFOHO UAN HIN लिहून मेसेज पाठवावा लागेल. पीएफ शिल्लक जाणून घेण्यासाठी ही सेवा इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि बंगालीमध्ये उपलब्ध आहे. पीएफ बॅलन्ससाठी, तुमचे यूएएन, बँक खाते, पॅन (PAN) आणि आधार (Aadhaar) जोडलेलं असणं आवश्यक आहे.

Read in English