ATM मधून फाटक्या नोटा आल्या तर करायचं काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 02:29 PM2021-04-04T14:29:49+5:302021-04-04T14:50:24+5:30

how can i exchange atm withdrawal damaged currency in india atm torn notes : एटीएममधून फाटलेल्या नोटा आल्या तर बँक बदलण्यास नकार देऊ शकत नाही.

सध्या रोख पैशांची गरज भासल्यास लोक एटीएममध्ये जातात आणि आवश्यकतेनुसार पैसे त्वरित काढून घेतात. परंतु कधीकधी असे घडते की एटीएममधून आलेलेल्या रोख रकमेत काही नोटा फाटलेल्या असतात. त्यामुळे बर्‍याचदा लोकांना त्रास सहन करावा लागतो.

दरम्यान, एटीएममधून फाटलेली नोट आल्यानंतर लोक विचार करू लागलात की आता या नोटचे काय करायचे? कारण, बाजारात ती कोण घेणार नाही.

अशा परिस्थितीत त्रास होणे साहाजिक आहे. परंतु याबाबत घाबरून जाण्याची गरज नाही, कारण तुम्ही सहजपणे फाटलेली नोट बदलू शकता.

आरबीआयच्या नियमात स्पष्टपणे म्हटले आहे की, जर एटीएममधून फाटलेल्या नोटा आल्या तर बँक बदलण्यास नकार देऊ शकत नाही. दरम्यान, फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी बँकेत कोणतीही दीर्घ प्रक्रिया नाही. काही मिनिटांत नोटा बदलल्या जाऊ शकते.

एटीएममधून काढताना फाटलेली नोट तुम्ही त्या बँकेत घेऊन जा, ज्या बँकेशी संबंधित एटीएम लिंक्ड आहे. बँकेत गेल्यानंतर अर्ज लिहावा लागेल. ज्यामध्ये आपल्याला तारखेचे नाव, वेळ, पैसे काढण्याचे ठिकाण नमूद करावे लागेल.

अर्जासह एटीएममधून त्या स्लिपची एक प्रतही जोडावी लागेल, जर ती स्लिप मिळाली नाही तर मोबाईलवरील व्यवहाराचा तपशील द्यावा लागेल. तुम्ही सर्व तपशील बँकेला देताच तुम्हाला दुसऱ्या नोटा त्वरित बदलून देण्यात येतील.

एप्रिल २०१७ मध्ये आरबीआयने आपल्या एका मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, बँका फाटलेल्या, मळलेल्या नोटा बदलण्यास नकार देऊ शकतील. सर्व बँका प्रत्येक शाखेत लोकांच्या फाटलेल्या नोटांची बदलून देतील आणि हे सर्व ग्राहकांच्या बाबतीत होईल.

जुलै २०१६ मध्ये आरबीआयने एका परिपत्रकात म्हटले आहे की, जर बँका खराब नोटा बदलण्यास नकार देत असतील तर त्यांना १०,००० रुपये दंड आकारला जाईल आणि हे सर्व बँकांच्या सर्व शाखांना लागू आहे.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, केवळ एटीएममधून खराब किंवा बनावट नोटा काढण्याची जबाबदारी बँकेची आहे. एटीएममध्ये नोटा घालणाऱ्या एजन्सीची देखील नाही.

नोटामध्ये काही दोष असल्यास बँकेच्या कर्मचाऱ्यांने याची तपासणी केली पाहिजे. नोटामध्ये सीरिअल नंबर, गांधीजींचा वॉटरमार्क आणि राज्यपालांची शपथ दर्शविली तर बँकेने ती नोट बदलली पाहिजे.

दरम्यान, काही परिस्थितींमध्ये नोटांची बदली केली जाऊ शकत नाही. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, सर्वास जळालेल्या नोटा, तुकडे - तुकडे असलेल्या नोटा बदलू शकत नाही. अशा नोटा फक्त आरबीआयच्या जारी केलेल्या कार्यालयात जमा करता येतील.