Zoom ला टक्कर, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ५० जणांसोबत व्हिडीओ कॉलचं नवं फिचर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 03:47 PM2020-05-12T15:47:21+5:302020-05-12T15:57:30+5:30

देशभरात गेल्या ५० दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्हिडीओ कॉलींग होताना दिसत आहे. कधीकाळी हाय प्रोफाईल नागरिकांमध्येच व्हिडिओ कॉलिंगची क्रेझ होती. आता, व्हिडीओ कॉलिंग ही गरज बनली आहे.

व्हॉट्सअॅपकडून व्हिडिओ कॉलिंगचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊनच, झुमला टक्कर देणारं नवं फिचर ऍड करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.

व्हॉट्सअॅप फिचरची माहिती देणाऱ्या WABetainfo या वेबसाईटच्या वृत्तानुसार, लार्ज ग्रुप व्हिडीओ कॉलिंग करण्यासाठी मेसेंजर ग्रुपमध्ये रिडायरेक्ट करण्यात येऊ शकते.

नुकतेच व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंगमध्ये ८ जणांना सहभागी करुन घेता येईल, असे फिचर दिले आहे. दरम्यान, मेसेंजर रुम्स च्या माध्यमातून कंपनीकडून एकाचवेळी ५० जणांचं व्हिडिओ कॉलिंग होईल, असं फिचर दिलं आहे.

WABetainfo ने WhatsApp Web Client च्या लेटेस्ट वर्जनमध्ये Messenger Room ची एक लिंक पाहिली, ही लिंक अँड्रॉईड वर्जनमध्येही देण्यात येणार असल्याचे समजते.

व्हॉट्सअपने वेब क्लाईंटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. जिथे एक पेपर क्लिप मेन्यू दिसून येत आहे. तेथे क्लिक केल्यास थेट मेसेंजर मेन्यूत रिडायरेक्ट केलं जाऊ शकतं.

सध्या हे फिचर कशा रितीने अॅड करायचं हे कंपनीकडून सांगण्यात आलं नाही. कारण, व्हॉटसअपमध्ये ५० जणांचं ग्रुप कॉलिंग करण्यासाठी फेसबुकला अकाऊंट असणं बधनकारक असेल की नाही.

देशभरात लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम पद्धतीने मोठ्या कंपन्यांमध्ये कामकाज सुरु आहे. या कंपन्यांकडून मिटींग्जच्या अरेंजमेंटसाठी सध्या झुम अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

अनेकांना केवळ ग्रुप कॉलिंगसाठी झुम अॅप डाऊनलोड करावे लागत आहे. त्यामुळे, मोबाईलमध्ये आणखी एक अॅप डाऊनलोड वाढते. त्यामुळेच, व्हॉट्सअपने ही सुविधा सुरु केल्यास व्हॉट्सअॅप युजर्संना फायदा होईल.

ग्रुप व्हिडीओ कॉलिंग हे आता गाव-खेड्यातही पोहोचले आहे, गावातील नागरिकही ग्रुप कॉलिंगचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहेत.