Gold Price Today: स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; उच्चांकी स्तरावरून 9,358 रुपयांची घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 12:59 PM2021-09-16T12:59:48+5:302021-09-16T13:10:24+5:30

नवी दिल्ली: सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) आज घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) सोन्याचे दर 0.17 टक्के दराने कमी झाले आहेत.

तर चांदीच्या किंमतीत (Silver price today) तेजी पाहायला मिळते आहे. आज चांदीचे दर 0.20 टक्के दराने वाढले आहेत. या वाढीनंतर चांदी 63,421 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत.

गेल्यावर्षी म्हणजेच 2020 ला एमसीएक्सवर ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आज एमसीएक्सवर सोन्याचे दर 46,815 रुपये प्रति तोळा आहे. त्यानुसार आज सोन्याचे दर 9,358 रुपये प्रति तोळाने स्वस्त आहेत.

ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत आज 46,815 रुपये प्रति तोळा आहे. सोन्याचे दर आज 0.17 टक्क्यांनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दर 0.20 टक्क्यांनी वाढून 63,421 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत.

तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.

या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.