Budget 2021| आज अर्थसंकल्पासह होणार हे 5 मोठे बदल, तुमच्यावर होणार थेट परिणाम

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 1, 2021 08:52 AM2021-02-01T08:52:35+5:302021-02-01T09:01:24+5:30

Five Big changes from 1st february about budget e- catering, LPG Gas, pnb banking rules :

अर्थमंत्री मंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याशिवाय 1 फेब्रुवारीपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. हे सर्व बदल सामान्य जनतेशी संबंधित आहेत. याचा थेट तुमच्यावरही परिणाम होणार आहे. यातील एक बदल बँकिंगशी संबंधित आहे. तर काही बदल थेट तुमच्या खिशालाच फटका देणारे आहेत. तर जाणून घेऊयात, 1 फेब्रुवारीपासून होणारे बदल...

अर्थसंकल्पात होऊ शकतात मोठे बदल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला वर्ष 2021-22चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. भारतीय इतिहासात पहिल्यांदाच आज पेपरलेस बजेट (अर्थसंकल्प) सादर होणार आहे.

कोरोना संकटामुळे सरकारने पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांपासून, ते उद्योजकांपर्यंत सर्वच जण या अर्थसंकल्पाकडे आशेने बघत आहेत. सरकारदेखील आरोग्य, कृषी आणि रोजगाराशीसंबंधित मोठ्या घोषणा करू शकते.

घरगुती गॅसच्या किमतीत बदल होण्याची शक्यता - देशातील तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅसच्या (LGP) किमतींसंदर्भात समीक्षा करतात. अशात या कंपन्या घरगुती गॅसच्या किमती वाढविण्याचा निर्णयही घेऊ शकतात. असे झाल्यास पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ बसू शकते. मात्र, ग्राहकांना या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या दिल्लीमध्ये अनुदानित 14.2 किलो गॅसच्या सिलेंडरची किंमत 694 रुपये एवढी आहे.

1 फेब्रुवारीपासून रेल्वे गाड्यांत ई-कॅटरिंग सुविधा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये ग्राहकांना ई-कॅटरिंगची सुविधा मिळत नव्हती. मात्र, आता कोरोना बाधितांची संख्या जस-जशी कमी होत आहे, तस-तशी रेल्वेतील सुविधाही वाढविण्यात यत आहे. 1 फेब्रुवारीपासून IRCTC ई-कॅटरिंग सेवा पुन्हा सुरू करत आहे. मात्र, ग्राहकांना ही सुविधा सध्या काही निवडक स्थानकांवरच मिळणार आहे.

रेल्वेने अनेक मार्गांवर रेल्वे चालविण्याचाही निर्णय घेतला आहे. मुंबईत सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवादेखील 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.

PNB एटीएममधून पैसै काढण्याचे नियम बदलणार- देशातील वाढती एटीएम फसवणूक रोखण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) एक मोठे पाऊल उचलले आहे. यानुसार, आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारी 2021 पासून पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना नॉन-ईएमव्ही एटीएम (Non-EMV ATM) मशीनद्वारे व्यवहार करता येणार नाही. आजपासून PNB ग्राहकांना नॉन-ईएमव्ही मशीद्वारे पैसे काढता येणार आहीत.

अनेक मार्गांवर विमानसेवा सुरू - विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही हळू-हळू वाढ होताना दिसत आहे. एअर इंडिया तसेच त्यांच्या लो कॉस्ट सब्सिडियरी Air India Express ने नव्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांचीही घोषणा केली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने फेब्रुवारीपासून 27 मार्च 2021 दरम्यान त्रिची आणि सिंगापूरदरम्यान रोज फ्लाइट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची संख्या वाढतेय - याशिवाय राजा भोज एअरपोर्टवरून इंडिगोच्या अहमदाबाद आणि लखनौ फ्लाइटची सुरुवातही 3 फेब्रुवारीपासून होत आहे. या दोन्ही फ्लाइट्स 74 सीटर असतील.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने गेल्यावर्षी 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणसेवा निलंबित केली होती.

Read in English