Big Alert : ६ कोटी नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी; १ जूनपासून EPFO चे नवे नियम लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 04:26 PM2021-05-30T16:26:34+5:302021-05-30T16:31:16+5:30

EPFO : ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास कंपनीकडून जमा होणारी रक्कम खात्यात येण्यास निर्माण होऊ शकते समस्या. पाहा काय करावं लागेल.

जर आपण नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्त्वाची आहे. ईपीएफओने भविष्य निर्वाह निधी खातेधारकांसाठी असलेल्या नियमांत काही बदल केले आहेत.

नव्या नियमानुसार आता कर्मचाऱ्याला नियुक्त करणाऱ्याला आपल्या प्रत्येक कर्मचार्‍याच्या खात्यास १ जूनपासून आधार कार्डाशी लिंक करणे आवश्यक आहे.

तर तुम्ही खातं आधार कार्डाशी लिंक केलं नाही तर तुमच्या खात्यात येणारं एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन थांबवलं जाऊ शकतं. त्यामुळे आपलं खातं त्वरित आधारशी लिंक करणं आवश्यक आहे.

ईपीएफओने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये कर्मचाऱ्यांना नियुक्त करणाऱ्यांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे आणि कर्मचार्‍यांच्या खात्याला आधार क्रमांकाशी जोडण्यास सांगितलं आहे.

जर यानुसार तुमचा आधार क्रमांक तुमच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्याशी जोडला न गेल्यास एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशनवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

ईपीएफओनं सोशल सिक्युरिटी कोड २०२० अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार ज्या खातेधारकांचं १ जून नंतर खातं आधार कार्जाशी लिंक नसेल त्यांचं इलेक्ट्रॉनिक चालान कम रिटर्न भरता येणार नाही.

यामुळे पीएफ खात्यात कंपनीकडून जो शेअर दिला जातो तो मिळण्यास समस्या निर्माण होऊ शकतात. कर्मचाऱ्यांना केवळ आपलाच शेअर खात्यात दिसणार आहे.

या नियमांतर्गत खातेधारकांचा यूएएनदेखील आधार व्हेरिफाईड असणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचं खातं आधार कार्डाशी लिंक करून घ्या.

त्यानंतर युएएनदेखील व्हेरिफाय करून घ्या. यामुळे कंपनीकडून मिळणाऱ्या त्यांच्या शेअरमध्ये कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.

यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल आणि त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये ईकेव्हायसीमध्ये जावं लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ज युएएनशी लिंक करा. ही प्रक्रिया तुम्ही ओटीपी प्रोसेसद्वारे पूर्ण करू शकता.