20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची विस्तृत माहिती, 'या' घटकांना धनलाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 07:19 PM2020-05-13T19:19:55+5:302020-05-13T20:27:12+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी स्वावलंबनचा नारा देश देशातील प्रगतीसाठी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केलंय.

मोदी सरकारने २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. त्यामध्ये, यापूर्वीच घोषित केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील १.७० कोटी रुपयांच्या पॅकेजचाही समावेश आहे.

शेतकरी सन्मान योजनेत २००० रुपयांची मदत, १५ रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचे पुढील ३ महिन्यांचा पीएफ सरकार भरणार आहे

अत्यावश्यक सेवेतील आरोग्य सुविधांसाठी १५ हजार कोटींच पॅकेज जाहीर

केंद्र सरकारच्या या पॅकेजनुसार आयटीआर रिटर्न मर्यादा नोव्हेंबर पर्यंत वाढवली जाईल,

सूक्ष्म, लघु, मध्यम (MSME) उद्योगांसाठी 100 कोटिपर्यंतचे कर्ज चार वर्षासाठी कोणत्याही गॅरंटी शिवाय मिळेल! यासाठी 3 लाख कोटीची तरतूद!

तोट्यातील MSME उद्योगांसाठी 20 हजार कोटींचे प्रोत्साहन पॅकेज!

MSME उद्योगांना आपल्या वाढीसाठी 50 हजार कोटींची योजना!

MSME उद्योगासाठीची गुंतवणूक मर्यादा वाढवली जाणार असून लघु आणि सुक्ष्म उद्योगांची नवीन व्याख्या ठरविण्यात येत आहे.

उद्योग गुंतवणूकीची नवीन मर्यादा - सूक्ष्म 10 लाख 1कोटी, लघु 2 कोटी 10 कोटी आणि मध्यम 10 कोटी 20 कोटी आणि *उद्योग टर्नओव्हर मर्यादा नवी मर्यादा - सुक्ष्म 1कोटी 10 कोटी, लघु 2 कोटी 50 कोटी, मध्यम 5 कोटी 100 कोटी

Msme ला जन लाभ मिळण्यासाठी यापुढे 200 कोटी पेक्षा कमी किमतीची टेंडर्स ही ग्लोबल टेंडर्स नसतील त्यामुळे या उद्योगांना त्या टेंडर्सचा लाभ मिळेल!

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी साठी आणखी तीन महिने केंद्र सरकार आधार देणार! आणखी तीन महिन्यांसाठी epf कॉन्ट्रीब्युशन सरकारकडून दिले जाईल!

तीन लाख कंपनी आणि 72 लाख कर्मचाऱ्यांना यांचा फायदा होईल!

30,000 कोटी रुपये एकूण रक्कम नॉन बँकिंग फायनान्स संस्था, हौसिंग फायनान्स संस्था यांना उद्योगवाढी साठी दिला जाईल

राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना उभारी देण्यासाठी 90 हजार कोटीची प्रोत्साहनपर योजना!

बांधकाम क्षेत्रातील कामांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

टीडीएस आणि टीसीएस टॅक्स रेट मार्च 2021 पर्यंत 25 टक्के कमी केला जाईल! याचा 50 हजार कोटीचा फायदा होईल!